Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असणार्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दर्शन घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri), अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) , अभिनेत्री पुजा सावंत (Pooja Sawant) यांचा समावेश होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

दुपारच्या सुमारास अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर काही वेळानंतर अभिनेत्री पुजा सावंत हिने गणपतीचे दर्शन घेतले. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुप्रसिध्द अभिनेता राजपाल यादव हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी दाखल झाले. महाआरतीपुर्वी त्यांनी उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर राजपाल यादव यांच्याहस्ते श्रींची महाआरती झाली. ट्रस्ट आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांच्यातर्फे मिनाक्षी शेषाद्री, पुजा सावंत आणि राजपाल यादव यांचा सत्कार देखील करण्यात आला. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन हे बाप्पांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर पुनीतदादा बालन यांच्या हस्ते सत्कार त्यांचा करण्यात आला. दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्रस्टच्या गणपतीचे दर्शन घेतले होते आणि सर्व विघ्न दूर करण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांकडे साकडे घातले होते. उद्या देखील अनेक सेलिब्रिटी, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि अनेक दिग्गज बाप्पांच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार (Video)
- 3 Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या कारण
The post Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन appeared first on बहुजननामा.