Header

MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)

MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)

Lalit Patil case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी हा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देणे योग्य आहे. अन्यथा पोलीस बनावट चकमकीत त्याला मारुन टाकतील, असा आरोप कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. (MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case)

ससून हॉस्पिटलमधून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देण्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ससून रुग्णालयातील एक शिपाई हा आरोपी ललित पाटील आणि एका मंत्र्यांमधील दुवा होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी यावेळी केली. (MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case)

ड्रग्स माफिया ललित पाटील याची पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली जात होती.
पाटील ससूनमधून अंमली पदार्थांची विक्री करत होता. पोलिसांची त्याला साथ असल्याने हा प्रकार झाला आहे.
त्यामुळे याचा केंद्रीय यंत्रणेमार्फत तपास होणे आवश्यक आहे. या प्रकरणात सरकारमधील तीन मंत्र्यांचा समावेश असल्याची चर्चा असून, तपासाची दिशा बदलण्यात आली आहे. या सर्व प्रकारात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या भोवतीही संशयाची सुई फिरत असून, त्यांच्या दूरध्वनीची तपासणी झाली पाहिजे, असेही धंगेकर म्हणाले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

The post MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article