Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या 55 वर्षाच्या नराधमाला अटक, हडपसर मधील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी 55 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.28) रात्री नऊच्या सुमारास फुरसुंगी येथे घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यशवंत काळुराम जाधव Yashwant Kaluram Jadhav (वय-55 रा. फुरसुंगी) याच्यावर आयपीसी 354, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात.
फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी आरोपीच्या नातीसोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी गेली होती.
त्यावेळी आरोपीने त्यांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे (PSI Khalde) करीत आहेत.
- Pune Crime News | जप्तीचा आदेश घेऊन गेलेल्या वकिलाला दमदाटी, खराडी परिसरातील प्रकार; तिघांवर FIR
- Maratha Reservation | पुण्यात मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिलं – ‘शासन स्वतःची खळगी भरण्यात व्यस्त जनतेच्या…’
- Devendra Fadnavis | ‘मी पुन्हा येईन’ व्हिडिओवर खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिले स्पष्टीकरण; ‘येणारी निवडणूक…‘
- Maharashtra Political News | भाजपाच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…
- Sahyadri Express | गुडन्यूज : सह्याद्री एक्स्प्रेस ५ नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार, सध्या पुणे ते कोल्हापूरपर्यंत
The post Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या 55 वर्षाच्या नराधमाला अटक, हडपसर मधील घटना appeared first on बहुजननामा.