Header

Pune Sassoon Drug Case | पुणे: ससून ड्रग रॅकेट प्रकरणांत विधानपरिषद उप सभापती व 7 आमदारांची चुप्पी शहरासाठी धोक्याची घंटा !

Pune Sassoon Drug Case | पुणे: ससून ड्रग रॅकेट प्रकरणांत विधानपरिषद उप सभापती व 7 आमदारांची चुप्पी शहरासाठी धोक्याची घंटा !

Drug Mafia Lalit Patil Escape Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Sassoon Drug Case | ड्रग माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) ससून मधून ड्रग रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आल्यानंतर तो फरार होऊन परत पकडला जाऊन 3 आठवडे झाले. त्याच्या या गुन्ह्यात पोलीस निलंबित (10 Pune Cops Suspended) झाले, डॉक्टरसह संपूर्ण यंत्रणा उघडपणे संशयाच्या फेऱ्यात आली. दुर्दैवाने युवा पिढी बरबाद करणाऱ्या या घटनेबाबत पुण्यातच राहणाऱ्या विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यासह एकमात्र आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) वगळता उर्वरित सात आमदारांनी अवाक्षरही काढले नाही. विशेष असेकी हे सर्वजण सध्या सत्तेत असून पुणे शहराच्या अब्रूचे धिंडवडे निघत असताना एकाला देखील राज्यात गाजत असलेल्या प्रकरणावर भुमिका घेणे जमले नाही हे विशेष. (Pune Sassoon Drug Case)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

ससून कारागृहात 9 महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग माफिया ललित पाटील हा 2 ऑक्टोबरला पसार झाला. विशेष असे की तत्पूर्वी काही तास अगोदरच ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटींचे मॅफेड्रोन या अंमली पदार्थाची विक्री करताना ससून मधील कर्मचाऱ्यासह एका पंटरला अटक करण्यात आली होती. तपासांती पाटीलच पोलीस कस्टडीत असताना ससून मधून हे रॅकेट चालवत होता हे लागलीच उघडकीस आले. पण तत्पूर्वीच पोलिस आणि ससून प्रशासनाच्या (Sassoon Hospital) आशीर्वादाने पाटील ने तेथून पोबारा केला होता. (Pune Sassoon Drug Case)

या घटनेनंतर मात्र राज्यभर वातावरण ढवळून निघाले. काँग्रेस चे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Shivsena UBT Leader) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यासह माध्यमांनी ससून मधील कैद्यांवरील कस्टडीत असताना उपचाराच्या वॉर्ड क्रमांक 16 मधील अनेक बाबी उघडकीस आणल्या. एवढेच न्हवे तर कस्टडीत असताना पाटील हॉटेल मध्येही मुक्काम ठोकत असल्यापासून त्याला महिलाही पुरवल्या जात असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती देत होते. त्यांनी दिलेले पुरावे हे खरेच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत गेले आणि या प्रकरणातील अटकांची संख्या आणि व्याप्ती वाढत गेली.

यानिमित्ताने ससून रुग्णालय, कारागृह प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला. चौकात अगदी झेब्रा क्रॉसिंगवर थांबले तरी वाहनचालकांवर दंडाचा बडगा उगरणारी पोलीस यंत्रणा, सर्वसामान्यांना बाहेरून औषधं खरेदी करायला लावणाऱ्या ससून रुग्णालयाचा आणखी एक गंभीर आणि भ्रष्टाचारी चेहेरा समोर आला. एवढंच न्हवे तर आणखी एक गंभीर बाब समोर आली ती राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट) तब्बल सात आमदारांचे मौन. नेमकी हीच बाब पुणेकरांना खटकू लागली आहे.

शैक्षणिक, औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून प्रसिद्ध झालेल्या पुणे शहराची लाईफ स्टाईल बदलली आहे.
एकेकाळी 9 वाजता झोपेच्या कुशीत विसवणाऱ्या पेन्शनराचं पुणे अहोरात्र जागु लागलं आहे. कोरेगाव पार्क, कल्याणीनगर,
विमाननगर, मुंढवा, खराडी, राजा बहादूर मिल रोड, बाणेर, बालेवाडी , महंमदवाडी एवढंच काय तर आंबेगाव पठार परिसरातील पब संस्कृती वीकेंड च न्हवे तर 365 दिवस बहरू लागली. हुक्का पार्लरच्या आडून नशेचा व्यापार दिवसेंदिवस वाढू लागला. सोयीने सुरू झालेल्या रुफ टॉप हॉटेल चे पीक जोमाने वाढू लागले. यात नवी पिढी भरडू लागली. संस्कृतीच्या राजधानीत पाश्चात्य संस्कृतीचा हैदोस सुरू झाला. विधी मंडळात या संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या अमदारांनी पुढे कारवाई का झाली नाही ? याचा फारसा पाठपुरावा केल्याचे ऐकिवात नाही. एवढेच काय तर कधी ही या पब आणि रुफटॉप मध्ये मालकी अथवा भागीदारी कोणाची ? असा साधा प्रश्न देखील केल्याचे ऐकिवात नाही. यामुळे वेगाने हप्तेखोरी, खंडणीखोरी आणि नशेबाजी या नव्या संस्कृतीची लागण शहराला वेगाने झाली. यातूनच पाटील सारख्या ड्रग माफियांनी ससूनसारखी गरिबांसाठी आशेचा किरण असलेली आरोग्य यंत्रणा नासवली, हे समोर आले आहे.

यानंतरही केवळ भौतिक विकासासाठी नेत्यांच्या मागेपुढे करणारे लोकप्रतिनिधी विशेषत आमदार सामाजिक
ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या ललित पाटील ड्रग रॅकेट प्रकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवत आहेत.
आतापर्यंत केवळ धंगेकर वगळता एकाही आमदाराने साधं पोलिसांना निवेदन दिले नाही की पालकमंत्र्यांकडे प्रश्न
उपस्थित केला नाही ,की साधं माध्यमांकडे स्वतःहून भूमिका मांडली नाही, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे.

उलट काही आमदारांची तर अन्य राज्यातल्या निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून त्यांच्यां पक्षाने नियुक्ती केली आहे.
पुण्यात गंभीर प्रश्न असताना केवळ पक्ष आदेश पाळण्यासाठी तेथे सत्ता मिळवण्यासाठी ही मंडळी जीवाचे रान करत आहेत.
जिथे सत्ता आहे आणि अधिकार आहे तेथे मात्र ही मंडळी मूग गिळून गप्प असल्याने पुण्याच्या नावलौकिकाला
आणि संस्कृतीला तडा जात असल्याची लोकभावना प्रबळ होत चालली आहे.

The post Pune Sassoon Drug Case | पुणे: ससून ड्रग रॅकेट प्रकरणांत विधानपरिषद उप सभापती व 7 आमदारांची चुप्पी शहरासाठी धोक्याची घंटा ! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article