Header

Cop Shoot Himself | भाऊबीजेच्या दिवशी अनर्थ, पोलिस कर्मचार्‍यानं पोलिस वसाहतीत रायफलनं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

Cop Shoot Himself | भाऊबीजेच्या दिवशी अनर्थ, पोलिस कर्मचार्‍यानं पोलिस वसाहतीत रायफलनं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

Maharashtra Solapur Police

सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – Cop Shoot Himself | सोलापूर शहर पोलिस दलात (Solapur City Police) सध्या कर्तव्यास असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍यानं केशवनगर पोलिस वसाहतीमध्ये रायफलनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच आज (बुधवार) सकाळी घडली आहे. राहुल शिरसट (35) असं आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचार्‍याचं नाव आहे. (Cop Shoot Himself)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलिस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत असणार्‍या राहुल यांनी आत्महत्या केल्यामुळे संपुर्ण सोलापूर शहर पोलिस दलासह सोलापूर ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. घटनेची खबर मिळाल्यानंतर सदर बाजार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुल यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तेथील डॉक्टरांनी राहुल यांना मृत घोषित केलं. (Cop Shoot Himself)

राहुल यांच्याकडे एसएलआर रायफल होती. ड्युटी झाल्यानंतर दररोज राहुल रायफल जमा करायचे.
मात्र, आज (बुधवार) त्यांनी सकाळी ड्युटी संपल्यानंतर रायफल जमा केली नव्हती. ते घरी रायफल घेवुन गेले.
केशव नगर पोलिस वसाहतीत त्यांनी राहत्या घरी रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. रायफलच्या आवाजाने पोलिस वसाहत हादरली.
राहुल यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

The post Cop Shoot Himself | भाऊबीजेच्या दिवशी अनर्थ, पोलिस कर्मचार्‍यानं पोलिस वसाहतीत रायफलनं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article