Header

Maharashtra Kesari Sikandar Shaikh | ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्ण पदक जिकण्यांचे स्वप्न – सिकंदर शेख

Maharashtra Kesari Sikandar Shaikh | ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्ण पदक जिकण्यांचे स्वप्न – सिकंदर शेख

Maharashtra Kesari Sikandar Shaikh

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Kesari Sikandar Shaikh | महाराष्ट्र केसरी कुस्ती जिकल्यानंतर आता मला हिंद केसरी (Hind Kesari) व्हायचे आहे. पण त्यापुढे जाऊन मला ऑलम्पिक स्पर्धेत (Olympics Games) भारतासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे. पुनीत बालन ग्रुपने (Punit Balan Group) मला सर्व सहकार्य करण्याचे जाहीर केले असून त्यामुळे मी नक्कीच ऑलम्पिकमध्ये पदक मिळवेल असा विश्वास महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख (Maharashtra Kesari Sikandar Shaikh) यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेते ठरलेल्या सिकंदर शेखचा युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना शेख म्हणाला, सलग तीन वर्ष प्रयत्न करूनही मला महाराष्ट्र केसरी किताबापासून दुर रहावं लागलं होत. यावेळेस मात्र महाराष्ट्र केसरीची गदा जिकायचीच होती. त्यामुळे या स्पर्धेकडे मी पुर्ण लक्ष केंद्रित केले होते. अखेर ही गदा मी जिंकली. आता मला हिंद केसरी स्पर्धा जिंकायची आहे. पण त्यापुढे जाऊन मला ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी जाऊन सुवर्ण पदक मिळवायचे आहे. पुनीत बालन ग्रुपने त्यासाठी मला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पुनीत बालन यांनी अनेक खेळांना आणि खेळाडूना मदत केली आहे. खेळाडूंच्या पाठीशी ते सतत उभे असतात. त्यांनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील. त्यांच्या पाठिंब्याने मी नक्कीच आपल्या देशासाठी ऑलंम्पिकमध्ये पदक मिळवेल असे शेख याने सांगितले. (Maharashtra Kesari Sikandar Shaikh)

सिकंदर शेख सारख्या प्रतिभावांत खेळाडूला पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तो नक्कीच भारताचे नाव उज्वल करेल असा आमचा विश्वास आहे.

पुनीत बालन, युवा उद्योजक (Punit Balan, Young Entrepreneur)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime News | लोणी काळभोर : महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, भररस्त्यात मारहाण करुन विनयभंग

The post Maharashtra Kesari Sikandar Shaikh | ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्ण पदक जिकण्यांचे स्वप्न – सिकंदर शेख appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article