Header

Pune Police MPDA Action | सहकारनगरमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 54 वी स्थानबध्दतेची कारवाई

Pune Police MPDA Action | सहकारनगरमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 54 वी स्थानबध्दतेची कारवाई

Pune Police MPDA Action

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police MPDA Action | सहकारनगर व भारती विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) शुभम शिंदे याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए (Pune Police MPDA Action) कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 54 वी कारवाई आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

शुभम सिताराम शिंदे Shubham Sitaram Shinde (वय-21 रा. स्फुर्ती अपार्टमेंट, सह्याद्रीनगर, धनकवडी, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार (Pune Crime News) आहे. त्याने सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत जीवघेण्या हत्यारांसह फिरताना चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत पसरवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

शुभम शिंदे याच्या विरोधात मागील पाच वर्षात 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. (Pune Police MPDA Action)

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे (Sr PI Surendra Malale) व पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (Sr PI A. T. Khobare) यांनी केली. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 54 गुन्हेगारांवर
एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगांच्या कृत्यांना
आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

The post Pune Police MPDA Action | सहकारनगरमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 54 वी स्थानबध्दतेची कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article