Header

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर सडकून टीका, म्हणाले – ”त्याच्या डोक्यात गटारातले…”

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर सडकून टीका, म्हणाले – ”त्याच्या डोक्यात गटारातले…”

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal

जालना : बहुजननामा ऑनलाईन – Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे यांची मनधरणी राज्य सरकार करत असल्याने दुखावलेले मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. जरांगे यांच्या मनात रोज नवनवीन कल्पना येतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मी करतो, असे भुजबळ म्हणाले होते. यावरून आता जरांगे यांनी भुजबळांवर सडकून टीका केली आहे. (Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

जरांगे म्हणाले, मराठा समाजाविषयी चांगले बोलावे इतका त्यांचा स्वच्छ हेतू कधीच नव्हता. हा खूप खालच्या दर्जाचा विचार करणारा माणूस आहे. मराठ्यांना हे आधीच समजले असते तर त्यांनी कधीच याला मोठे केले नसते. मराठ्यांना वाटले होते हा माणूस चांगल्या विचारांचा आहे. पण त्याच्या डोक्यात गटारातले किडे भरले आहेत. (Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal)

मनोज जरांगे म्हणाले, मराठे भुजबळांना चांगला माणूस समजत होते.
त्यामुळे त्यांनी भुजबळांना मोठे केले. परंतु, आता ते मराठा समाजाविरोधात गरळ ओकू लागले आहेत. परंतु, आता लोकांना समजले आहे की या माणसाच्या आत किती मोठी गटारगंगा आहे. याच्या डोक्यात मराठा समाजाविषयी विष आहे. ते नेहमी कुचके बोलत असतात. मी भुजबळांना एकच सांगेन, आमच्या नादी लागू नका, शहाणे व्हा, असा इशारा जरांगे यांनी दिला.

The post Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर सडकून टीका, म्हणाले – ”त्याच्या डोक्यात गटारातले…” appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article