Header

Pune Crime News | 17 वर्षीय मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, खडकी परिसरातील घटना

Pune Crime News | 17 वर्षीय मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, खडकी परिसरातील घटना

Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) पाठलाग करुन तिची छेड काढून विनयभंग (Molestation Case) केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. हा प्रकार पीडित मुलीच्या घराजवळ मागील दीड वर्षापासून सुरु आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Pune Police) तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने गुरुवारी (दि. 14) खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन फरदीन खान (वय-22 रा. मुळा रोड, खडकी) याच्यावर आयपीसी 354ड, 504 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरदीन खान हा फिर्य़ादी यांच्या 17 वर्षीय मुलीचा मागील दीड वर्षापासून
पाठलाग करत आहे. गुरुवारी पीडित मुलगी तिच्या राहत्या घराच्या परिसरात असताना आरोपीने तिची छेड काढून
स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला जाब विचारला असता ‘मी घरी येणार तिला घेऊन जणार, कोणास काही सांगितले तर तुम्हाला जिवे सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याचे फिर्याद नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शारदा वालकोळी (API Sharda Valkoli) करीत आहेत.

The post Pune Crime News | 17 वर्षीय मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, खडकी परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article