Header

Pune Crime News | किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना; एकजण ताब्यात

Pune Crime News | किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना; एकजण ताब्यात

Murder In Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | चारचाकी गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरुन 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला धारदार हत्याराने व दगडाने मारहाण (Beating) करुन खून (Murder) केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.12) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी ते चंदवाडी रोडवर घडली आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अभिषेक संजय भोसले Abhishek Sanjay Bhosale (वय 30 रा -शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (रा. चंदवाडी, फुरसुंगी) व इतर 7-8 अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 302, 323, 143, 145, 148, 149, 504, 506 सह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत भोसले यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय-18 रा – 209, ऑर्चीड रिसिडेन्सी शेवाळवाडी ता -हवेली पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन सकट याला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामा अभिषेक भोसले यांची स्विफ्ट गाडी घासल्याच्या कारणावरून
आरोपी विलास सकट याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. याच वादाच्या कारणावरुन आरोपील विलास सकट,
कैलास सकट, सचिन सकट व इतर 7-8 इसमानी संगनमत करून शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच लोखंडी धारदार शस्त्राने व दगडाने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने जबर मारहाण करून त्याला जीवे ठार मारले.
तसेच फिर्यादी अडवायला गेला असता त्याला सुद्धा दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव (API Nanasaheb Jadhav) करीत आहेत.

The post Pune Crime News | किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना; एकजण ताब्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article