Header

Pune Crime News | ‘तेरे को आज खल्लास कर देंगे’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार, बोपोडी मधील घटना; एकाला अटक

Pune Crime News | ‘तेरे को आज खल्लास कर देंगे’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार, बोपोडी मधील घटना; एकाला अटक

Attempt to kill

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | जुन्या भांडणाच्या रागातून दोन जणांनी एका तरुणावर धारदार चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Pune Police) दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.16) रात्री सव्वा अकराच्या सुमारास बोपोडी येथील आदर्श नगर येथे घडला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत शिवा जयराम बन्सल (वय-21 रा. मदीने मस्जिद शेजारी, आदर्श नगर, बोपोडी) याने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) रविवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. यावरुन छोटू उर्फ रविंद्र यादव (वय-22), समीर उर्फ सॅम बाशा मुजावर (वय-19 रा. आदर्श नगर, बोपोडी) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन समीर उर्फ सॅम मुजावर याला अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी यांचा भाऊ गणेश बन्सल (वय-19) याचे आणि आरोपी समीर मुजावर यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन आरोपी शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी गेले. छोटू यादव याने फिर्यादी यांच्या भावाला घरातून बाहेर बोलवून घेतले.

छोटू यादव याने गणेश याला पाठिमागून पकडले. तर मुजावर याने ‘तेरे को आज खल्लास कर देंगे’ असे म्हणत
सोबत आलेल्या धारदार चाकूने गणेश याच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर व हातावर सपासप वार करुन गंभीर जखमी
करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी भांडण पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना चाकू दाखवून
‘हमारे बीच कोई आया तो काट डालूंगा’ असे म्हणून दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ (PSI Gunjal) करीत आहेत.

The post Pune Crime News | ‘तेरे को आज खल्लास कर देंगे’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार, बोपोडी मधील घटना; एकाला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article