Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Drug Mafia) रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (Sudhakar Sakharam Ingale) याला काही दिवसांपूर्वी अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यानंतर आता येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक केली आहे. (Pune Drug Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ललित पाटील हा अंमली पदार्थाच्या तस्करी (Drug Trafficking) प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) होता. त्यावेळी त्याने आजारी असल्याचा बहाणा केल्यानंतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याने तेथून नाशिक येथे ड्रग्ज तयार करण्याच्या कारखान्यासह ड्रग्ज रॅकेट (Pune Drug Case) चालवल्याचे तपासात निष्पन्न झाले. ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काशिनाथ मरसाळे (वय-53) यांनी शिफारस केली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी त्यांना अटक केली आहे.
डॉ. संजय मरसाळे यांना बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) दाखल असलेल्या आयपीसी 223, 224,
225, 120(ब), 201, 34 मध्ये सोमवारी (दि.4) दुपारी साडेबारा वाजता अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे (Unit-2) पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai)
करत आहेत. डॉ. संजय मरसाळे यांनी आजपर्यंत कुणाकुणाला ससून रुग्णालयात दाखल होण्याचे शिफारस पत्र पाठवले
याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच त्यांना या मोबदल्यात किती पैसे घेतले, कसे व कोणत्या मार्गाने घेतले याचा
तपास गुन्हे शाखा करीत आहे.
- RMD Foundation | रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल
- Pune Crime News | पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार
- Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…
- Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!
The post Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई appeared first on बहुजननामा.