Header

Pune Fire News | सुरक्षा डोअर गोदामाला भीषण आग; लोणी काळभोरमधील घटना

Pune Fire News | सुरक्षा डोअर गोदामाला भीषण आग; लोणी काळभोरमधील घटना

Pune Fire News

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire News | पुणे -सोलापूर रोडवरील (Pune-Solapur Road) लोणी काळभोर येथील बोरकर वस्तीमध्ये असलेल्या सुरक्षा डोअर (Security Door) या लाकडी सामान असलेल्या गोडावूनला पहाटे भीषण आग (Pune Fire News) लागली. या आगीत गोदामातील सर्व सामान जळून खाक झाले. आग लागली तेव्हा तेथे कोणीही नसल्याने दुर्घटना टळली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

लोणी काळभोर मधील बोरकर वस्तीमध्ये सुरक्षा डोअर हे घरांसाठी सेफ्टी डोअर बनविणार्‍या कंपनीचे गोडावून आहे.
गोडावून बंद असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोडावूनमधून धूर येत असल्याचे परिसरातील लोकांनी पाहून अग्निशमन दलाला (Fire Brigade) कळविले. गोडावूनच्या मागच्या बाजूला आग लागली होती. पुणे अग्निशमन दल व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या (PMRDA Fire Brigade) ३ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी गोडावूनच्या मागील भागाचे पत्रे उचकटले, खिडकीतून पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आज विझविण्यात यश आले. (Pune Fire News)

गोडावूनमधील तयार साहित्य तसेच कंटिंग मशीन व अन्य यंत्रसाम्रुगी या आगीत जळून खाक झाली.
गोडावून बंद असल्याने नेमकी आग कशी लागली याचे कारण समोर येऊ शकले नाही.

The post Pune Fire News | सुरक्षा डोअर गोदामाला भीषण आग; लोणी काळभोरमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article