Header

Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 64 वी स्थानबध्दतेची कारवाई

Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 64 वी स्थानबध्दतेची कारवाई

Pune Police MPDA Action

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आदित्य नितीन बद्दप Aditya Nitin Baddap (वय-22 रा. साप्रस लाईन बाजार, पुर्व खडकी, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 64 वी कारवाई आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आदित्य बद्दप विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह चंदननगर (Chandannagar Police Station), खडकी (Khadki Police Station), विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांसह जबरी चोरी, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागिल पाच वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवितास व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी आदित्य बद्दप याच्यावर एपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध (Pune Police MPDA Action) करण्याचा प्रस्ताव
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी
करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी आदित्य बद्दप याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात
(Nagpur Central Jail) एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारावाई विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Senior PI Dattatraya Bhapkar),
गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre), पोलीस अधिकारी
व अंमलदार यांच्या पथकाने केली.

The post Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 64 वी स्थानबध्दतेची कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article