Header

Pune Crime News | पुणे : मुलीवर अत्याचार करुन उकळले पैसे, लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर FIR

Pune Crime News | पुणे : मुलीवर अत्याचार करुन उकळले पैसे, लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर FIR

Pune Rape Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्याकडून 80 हजारांची रक्कम उकळणाऱ्या उस्मानाबाद येथील तरुणाविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 पासून वारंवार पुणे व उस्मानाबाद येथे घडला आहे. (Pune Rape Case)

याबाबत केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.26) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सागर वामन रठोड (वय-29 रा. कोसगाव इटकळ, जि. उस्मानाबाद) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये मागील सहा वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. तसेच फिर्य़ादी यांच्यासोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याच दरम्यान सागर याने पीडित तरुणीला पैशांची गरज असल्याचे सांगून 80 हजार रुपये उसने घेतले. त्यापैकी फक्त पाच हजार रुपये त्याने परत केले. तरुणीने उर्वरित पैशांची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. तसेच तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणत बघुन घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करित आहेत.

The post Pune Crime News | पुणे : मुलीवर अत्याचार करुन उकळले पैसे, लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article