Pune Mundhwa Police | खुनाच्या प्रयत्न करुन दोन महिने फरार असलेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Mundhwa Police | जुन्या भांडणाच्या कारणावरुन एकाला जीवे मारण्याची धमकी देऊन कोयत्याने वार केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली होती. याप्रकरणी एका तरुणावर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी दोन महिन्यांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.18) उरुळी कांचन येथे करण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनुप ढगे (वय-23 रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर मुंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 504, 506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा येथील जनसेवा बँकेच्या समोर 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते आठच्या दरम्यान घडली होती.
आरोपी अनुप ढगे हा गुन्हा झाल्यापासून गेले दोन महिने स्वत:चे अस्तीत्व लपवून फिरत होता. गुरुवारी मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार महेश पाठक यांना माहिती मिळाली की, खुनाच्या प्रयत्नातील दोन महिने फरार असलेला आरोपी अनुप ढगे हा उरुळी कांचन येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने उरुळी कांचन येथील पीएमटी बस स्टँड येथे सापळा रचला. अनुप ढगे त्याठिकाणी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अति. कार्य.) अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 ए राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi), पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता रोकडे, सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, संतोष काळे, दिनेश भांदुर्गे, संतोष जगताप, महेश पाठक, झुरंगे, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.
The post Pune Mundhwa Police | खुनाच्या प्रयत्न करुन दोन महिने फरार असलेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या appeared first on बहुजननामा.