Pune Pimpri Chinchwad Crime News | चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चारित्र्यावर संशय (Character) घेऊन पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Committed Suicide) केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मंगळवार पेठेत (Mangalwar Peth) घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दिक्षा तेजस कांबळे (वय-27 रा. मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिक्षाचा पती तेजस सुरेश कांबळे (वय-33 रा. मंगळवार पेठ) याच्यावर आयपीसी 306, 498(अ) 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत दिक्षा च्या 47 वर्षीय आईने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) सोमवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे तेजस कांबळे याच्यासोबत लग्न झाले होते.
लग्नानंतर आरोपीने आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करत नाही म्हणून तिचा छळ केला.
तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसीक व शाररीक त्रास दिला. तेजस याने दिक्षाला शिवीगाळ करुन मारहाण केली.
पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (API Shinde) करीत आहेत.
- नववर्षाच्या मध्यरात्री गोव्यातील एक कोटींचे मद्य जप्त; बंगळुरु – मुंबई बाह्यवळण मार्गावर उत्पादन शुल्कची कारवाई
- महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीला मारहाण; कोंढवा परिसरातील घटना
- पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, बच्चन सिंग, श्रवण दत्त यांचा समावेश
- ते होते 13 वर्ष पोलीस पाटील, आता पुढे आले त्यांना तीन अपत्य; शासनाची फसवणुक केल्याने निलंबित
- इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना
The post Pune Pimpri Chinchwad Crime News | चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR appeared first on बहुजननामा.