Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : ब्रेकअप केल्याच्या रागातून भररस्त्यात तरुणीला प्रियकराकडून मारहाण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ब्रेकअप (Breakup) केल्याच्या रागातून तरुणाने तरुणीच्या गाडीची चावी काढून घेत मोबाईल हिसकावला. तसेच तिला अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांनी विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.28) दुपारी दोनच्या सुमारास नऱ्हे परिसरातील गावगाडा हॉटेल समोरील सर्व्हिस रोडवर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत भोर तालुक्यातील 32 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन कुणाल चंद्रकांत सुर्यवंशी (वय-35 रा. बिबवेवाडी ओटा कॉलनी, पुणे) याच्यावर आयपीसी 354ड, 327, 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध (Love Affair) होते. मात्र, त्यांच्यात ब्रेकअप झाल्याने आरोपीने पीडित तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. मात्र, तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने रविवारी दुपारी तिचा पाठलाग केला. नऱ्हे येथील गावगाडा हॉटेल समोरील सर्व्हिस रोडवर तिला आडवले. मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून तिला हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला.
त्यावेळी तरुणीला तिच्या मित्रांचे फोन येत असल्याने आरोपीने तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तिच्या दुचाकीची चावी आणि मोबाईल हिसकावून घेतला. तरुणीने गाडीची चावी आणि मोबाईल मागितला असता तु माझ्यासोबत आली तर देतो नाहीतर देणार नाही, तुला कुठे जायचे ते जा अशी धमकी दिली. तसेच अश्लील शिवीगाळ करुन तरुणीची दुचाकी व मोबाईल घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री, दोन लाखांचे कपडे जप्त
- Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 19 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | तरुणांच्या हाती देशाची प्रगती; लेफ्टनंट कर्नल साहिल गौतम यांचे प्रतिपादन (Video)
The post Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : ब्रेकअप केल्याच्या रागातून भररस्त्यात तरुणीला प्रियकराकडून मारहाण appeared first on बहुजननामा.