Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बदनामी करण्याची धमकी देऊन एका विवाहित महिलेकडे शारीरिक संबंधाची (Physical Relationship) मागणी केली. तसेच मुलाच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी ऑगस्ट 2023 ते आजपर्यंत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडित महिलेने मंगळवारी (दि.23) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अजय नागटिळक (वय अंदाजे 30 ते 35 रा. इंदिरा वसाहत, गणेश खिंड रोड, औंध) याच्यावर आयपीसी 354, 354(अ), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा ओळखीचा आहे.
आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या पतीसोबत ओळख वाढवली.
त्यानंतर आरोपीने महिलेला ‘तु मला आवडतेस माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची’ मागणी केली.
संबंध ठेवले नाहीतर बदनामी करण्याची धमकी दिली.
तसेच पतीला खोटे सांगून मुलाच्या जिवाचे बरे वाईट करेन असे मेसेज महिलेच्या मोबालवर केले.
याबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विनयभंग आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल
केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना
- Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक
- Pune Pimpri Chinchwad Crime News | मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त
The post Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.