Header

17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपचा धमाका, 14 नोव्हेंबरला होणार जेतेपदाचा फैसला

17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपचा धमाका, 14 नोव्हेंबरला होणार जेतेपदाचा फैसला

t-20-world-cup

आयसीसीने अपेक्षेप्रमाणे मंगळवारी टी-20 वर्ल्ड कपचे स्थळ व तारीख याबाबत घोषणा केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार असून 14 नोव्हेंबरला जेतेपदाचा फैसला होणार आहे. हिंदुस्थानातून हलवण्यात आलेली ही स्पर्धा आता यूएई व ओमान या दोन स्थळी पार पडेल. पण या स्पर्धेचे आयोजक बीसीसीआयच असणार आहे, असेही आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चार स्टेडियम्समध्ये रंगणार लढती

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ही चार स्टेडियम्समध्ये पार पडणार आहे. यूएईमधील दुबई, अबुधाबी व शारजाह या तीन स्टेडियम्ससह ओमानमधील क्रिकेट अॅपॅडमी ग्राऊंड येथे या स्पर्धेच्या लढती रंगणार आहेत.

ओमानमध्ये पहिल्या फेरीच्या लढती

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल. या फेरीत 12 सामने होतील. दोन गटांतील सर्वोत्तम दोन संघ ‘सुपर 12’ या फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या फेरीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, नेदरलॅण्ड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान व पप्पुआ न्यू गिनी या देशांचा सहभाग असेल. त्यानंतर ‘सुपर 12’ फेरीमध्ये 12 देशांची दोन गटांत विभागणी केली जाईल. यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएलचा उर्वरीत मोसम पार पडणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील लढतींसाठी यूएईतील स्टेडियम्समधील खेळपट्टय़ा चांगल्या रहाव्यात यासाठी टी-20 वर्ल्ड कपमधील सुरुवातीच्या फेऱयांमधील लढती ओमान येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतरच्या टी-20 वर्ल्ड कपच्या फेऱयांमधील लढती यूएईतील अबुधाबी, शारजाह व दुबई येथे होतील.

कोरोनामुळे स्पर्धा हलवली – सौरभ गांगुली

हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करायला नक्कीच आवडले असते. पण हिंदुस्थानात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे आम्हाला ही स्पर्धा यूएई व ओमान येथे हलवावी लागली. वर्ल्ड चॅम्पियनशिप प्रतिष्ठsची समजली जाते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मात्र आताही या स्पर्धेचे आयोजक बीसीसीआयच आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली या वेळी म्हणाले.

पाच वर्षांनंतर होणार स्पर्धा

टी-20 वर्ल्ड कप ही स्पर्धा तब्बल पाच वर्षांनंतर खेळवण्यात येत आहे. याआधी 2016 साली हिंदुस्थानात ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत वेस्ट इंडीजने इंग्लंडला हरवून चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता. आता यूएई व ओमान येथे ही स्पर्धा होणार असून पुढल्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article