Header

आरटीई प्रवेश घेण्यास 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेश घेण्यास 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

rte-2

25 टक्के कोटय़ांतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पहिल्या सोडतीनुसार प्रवेश घेण्याची मुदत आज 30 जून रोजी संपली, परंतु गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना प्राप्त होणाऱया ओटीपीच्या तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन प्रवेश निश्चित करण्यास उशीर होत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी स्पष्ट केले.

अजूनही जे पालक प्रवेश घेण्यासाठी शाळेत गेलेले नाहीत किंवा ज्या पालकांना अजूनही लॉटरी लागल्याचे कळलेले नाही अशा पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती देण्यात यावी अशा सूचनाही जगताप यांनी शिक्षणाधिकाऱयांना दिल्या आहेत.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article