Header

Actor ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

Actor ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

Actor ujjwal | Actor Ujwal Dhangar dies of heart attack; Mourning on Marathi art world

ठाणेः बहुजननामा ऑनलाइन (news marathi) – Actor ujjwal | स्वराज्यरक्षक संभाजी ( Swarajya Rakshak Sambhaji ) या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता उज्वल धनगरचे (Ujjwal Dhangar) (वय 29) याचे सोमवारी (दि. 28) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने टिटवाळा येथील रुग्णालयात निधन झाले. त्याच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडिया(social media)द्वारे अनेक कलाकारांनी उज्वलला श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वांना हसवणारा कलावंत हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.

उज्वल हा शनिवारी क्राइम पेट्रोल(Crime Patrol) या हिंदी मालिकेचे शूटिंग संपवून घरी आला होता. सोमवारी सकाळी 6 वाजता अचानक त्याच्या छातीत व पोटात दुखू लागले. त्यामुळे तो टिटवाळा(Titwala) येथील महागणपती रुग्णालयात(Mahaganapati Hospital) गेला. तेथे डॉक्टरांशी बाेलून ॲसिडिटी झाल्यासारखे वाटते म्हणून गोळी घेऊन घरी परतला. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने ताे आई-वडिलांसाेबत महागणपती रुग्णालयात दाखल झाला. तेथे उपचारांदरम्यान ईसीजी(ECG) लावल्यानंतर तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टिटवाळा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.

2008 मध्ये उज्वलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले हाेते.
त्याने मराठी रंगभूमीवर चित्रपट अन् मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
मूळचा सापगाव (ता. शहापूर) येथील रहिवासी असलेला उज्ज्वल हा गेल्या 15 वर्षापासून टिटवाळा येथे राहत होता. उज्वलने स्वराज्यरक्षक संभाजी, ‘लक्ष्य, क्राईम पेट्रोल या सारख्या मालिकांमध्ये काम केले होते.

web title : Actor ujjwal | Actor Ujwal Dhangar dies of heart attack; Mourning on Marathi art world

EPFO | मोदी सरकारचा नोकारदारांना मोठा दिलासा ! आता मार्च 2022 पर्यंत तुमच्या सॅलरीतून कपात नाही होणार PF चे पैसे

Marathwada agriculture university Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Petrol-Diesel Price | इंधन दरात वाढ सुरूच, महिन्यातील 16 वी दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Police News | BHR घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार जितेंद्र कंडारेला अटक; पुणे पोलिसांनी इंदूर येथून घेतलं ताब्यात

The post Actor ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article