कोस्टल रोडच्या बांधकामाचा मार्ग मोकळा, टाटा गार्डनमधील झाडे तोडण्यास आक्षेप घेणारी याचिका फेटाळली
मुंबई कोस्टल रोडच्या बांधकामासाठी टाटा गार्डन मधील झाडे महानगरपालिका नियमांचे उल्लंघन करून तोडत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या ‘सोसायटी फॉर इप्रूमेंट ग्रीनरी अँड नेचर’ संस्थेला आज न्यायालयाने खडसावले. अशा प्रकारची याचिका करून तुम्ही लोकहिताच्या प्रकल्पात खोडा घालताय असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोस्टल रोडसाठी 61 झाडे तोडण्यात येणार असून 79 झाडांचे पुनर्रेपण करण्यात येणार आहे. पालिकेने निर्णय घेतला त्यावेळी हरकती मागविण्यात आल्या पण याचिकाकर्त्यांनी चार महिन्यांनी आक्षेप घेतला असे पालिकेकडून न्यायालयाला सांगण्यात आले.
60 कोटी भरायला तयार आहात का?
या प्रकरणावर सुनावणी घेण्यापूर्वी प्रकल्पाच्या 0.5 टक्के म्हणजे 60 कोटी आधी कोर्टात जमा करा, हे पैसे कोर्टात भरायला आता तुम्ही तयार आहात का? अशी विचारणा याचिकाकर्त्याना केली. मात्र याचिकाकर्त्यांनी त्यावर असमर्थता दाखवली. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.