Header

बनावट लसीकरण प्रकरणी आणखी गुन्हा दाखल, 690 जणांना दिली होती लस

बनावट लसीकरण प्रकरणी आणखी गुन्हा दाखल, 690 जणांना दिली होती लस

bogus-vaccination

बनावट लसीकरण प्रकरणी आज समतानगर पोलिसांनी डॉ. मनीष त्रिपाठी, डॉ. अनुराग, रोशनी पटेल, मोहंमद करीम विरोधात गुन्हा दाखल केला. मुंबईतील हा 9 वा गुन्हा आहे. पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपासासाठी एक पथक तयार केले आहे.

एप्रिल महिन्यात 23, 24 आणि 28 एप्रिलला रोझी ब्लु, इंटरकॉन्टिनेंटल डायमंड, बनास ज्वेलर्स आणि आरबी कटर्स या चार कंपन्यांनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित केला होता. त्या कॅम्पमध्ये 690 जणांना लस देण्यात आली होती. लसीकरणासाठी या टोळीने पालिकेची परवानगी घेतली नव्हती. तसेच कोविशिल्ड या लसीच्या कुप्या पालिकेकडे दिल्या नव्हत्या. लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन देखील केले गेले होते. बनावट लसीकरण प्रकरणी पालिकेने समतानगर पोलिसांना एक अहवाल सादर केला. त्या अहवालानंतर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱयाने दिलेल्या तक्रारीवरून आज समतानगर पोलिसांनी डॉ. त्रिपाठी, डॉ. अनुराग, मोहंमद करीम, रोशनी पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक गणेश पवार करत आहेत. बनावट लसीकरण प्रकरणी जबाब नोंदवले जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंद हाके यांनी सांगितले. त्या कॅम्पमध्ये लस कोणी आणली होती, डॉ. अनुराग आणि रोशनी पटेल यांचा लसीकरणात कसा सहभाग होता त्याचा सखोल तपास केला जाणार आहे.

अंबोलीतही डॉक्टरविरुद्ध गुन्हा

बनावट लसीकरण प्रकरणी आज अंबोली पोलिसांनी डॉ. राजेश पांडे सह अन्य जणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. फसवणुकीचा मुंबईतील हा दहावा गुन्हा आहे. तक्रारदार हे क्वान या कंपनीत काम करतात. अंधेरीच्या एका रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण कॅम्प आयोजित करण्याच्या नावाखाली 3 जूनला पांडेने तक्रारदारकडून 2 लाख 94 हजार रुपये घेतले. 4 जूनला पांडे आणि त्याच्या अन्य साथीदारांनी लसीकरण कॅम्प आयोजित केला. त्या कॅम्प मध्ये 218 जणांना कोवीशिल्डऐवजी इतर द्रव्य दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन अंबोली पोलिसांनी राजेश पांडे अन्य जणा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यात अद्याप कोणालाही अटक नाही.

कोरोनाविरोधातील लढाईसाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरणास प्राधान्य देणे महत्वाचे आहे. मुंबईत सध्या विविध लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी केली जात असून कोणत्याही अडथळांशिवाय नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्याच अनुंषगाने मुंबईतील एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे फोटो काढण्यात व्यस्त असलेले पालिका अधिकारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article