Header

‘स्मार्ट सिटी’त भाजपचा 110 कोटींचा घोटाळा, आमदार प्रसाद लाड यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

‘स्मार्ट सिटी’त भाजपचा 110 कोटींचा घोटाळा, आमदार प्रसाद लाड यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

prasad-lad-new-image

भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील विविध कामांमध्ये 110 कोटींचा घोटाळा केला आहे. या पंपनीने आर्थिक लूटमार केली असून आमदार लाड यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शिवसेनेने केली आहे.

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांचा भांडापह्ड करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी आकुर्डीतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीबरोबर क्रिस्टल इंटिग्रेटेड पंपनीने ठेकेदार, उपठेकेदार म्हणून महत्त्वाचे व्यवहार केले आहेत. क्रिस्टल पंपनीमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असे चारजण संचालक मंडळावर आहेत. या पंपनीने स्मार्ट सिटीचे काम टेक महिंद्रा पंपनीकडून जॉइंट व्हेंचरमध्ये घेतले. सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी ठेके मिळविले आहेत.

पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी पंपनीने 350 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा 520 कोटी रुपयांना बहाल करण्यात आली. या निविदेत गडबड घोटाळा आहे. पाणी मीटर खरेदीतच पाणी मुरत आहे. खुल्या बाजारात 10 ते 15 हजार रुपयांत मिळणारे एक पाणीमीटर 1 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. या पाणीमीटरच्या व्यवहारातच सुमारे 72 कोटी 62 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पैशांची अफरातफर आहे. सर्वच रूमला लागणारे एकाच पंपनीचे व मॉडेलचे फायरवॉलचे एकाच पंपनीचे दर वेगवेगळे आहेत.

डिझेल जनरेटर इंस्टॉलेशन करण्याचा दर महिंद्रा पंपनीने 2 कोटी 57 लाख 91 हजार इतका दिला आहे, तर महिंद्राच्या एमआरपीमध्ये सरकारच्या पोर्टलवर त्यांचा दर 21 लाख 26 हजार 655 रुपये इतका आहे. त्यात 2 कोटी 20 लाख रुपये जास्त दिसून येतात. काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे 25 ते 30 कोटी रुपये दंड लावणे अपेक्षित असताना केवळ काही लाखांचा दंड दाखवण्यात आला आहे. कोरोना सुरू होण्याच्या आधी मुदत संपलेली असताना कोरोनाचे कारण सांगून सरकारी निर्णयाचा गैरफायदा घेऊन स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाकडून सल्लागाराने अत्यंत शिताफीने दंड वाचवला असल्याचेही त्या म्हणाल्या.

ऑनलाइन ‘वॉटर क्वॉलिटी अॅनालायसिस एसटीपी मॉनिटरिंग सिस्टीम’साठी लागणाऱया पंपनीचे प्रॉडक्ट बसविण्याचा विषय संचालक मंडळापुढे आहे. यात दर्जेदार पंपनी वगळून साध्या पंपनीकडून हे साहित्य घेऊन 10 कोटी लाटण्याचा डाव सुरू आहे. 520 कोटींच्या कामात क्रिस्टल इंटिग्रेटेड पंपनीने 110 कोटी रुपये लाटल्याचा आरोप उबाळे यांनी केला. त्यामुळे या पंपनीची चौकशी व्हावी. नातलग संचालक पदावर असल्याने आमदार लाड यांची ईडी व पॅगमार्फत चौकशी व्हावी. त्यांचे आमदार पद रद्द व्हावे. अन्यथा आम्हाला न्यायासाठी आंदोलन करावे लागेल असा इशाराही उबाळे यांनी दिला. निवडून आलेल्या नगरसेवक पिंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारीत सहभाग घेतला, तर त्यांचे नगरसेवक पद रद्द होते. असा कायदा असताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे पदही रद्द होणार का, असा सवालही त्यांनी केला.

जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, नगरसेविका मीनल यादव, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत कोऱहाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, कार्यालयीन प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

520 कोटींचे काम, 110 कोटी खिशात
520 कोटींच्या कामात क्रिस्टल इंटिग्रेटेड पंपनीने 110 कोटी रुपये लाटले आहेत. त्यामुळे या पंपनीची चौकशी व्हावी. नातलग संचालक पदावर असल्याने आमदार लाड यांची ईडी व पॅगमार्फत चौकशी व्हावी. त्यांचे आमदारपद रद्द व्हावे अन्यथा आम्हाला न्यायासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article