भाजप आमदाराकडून महिलेवर बलात्कार, पोलिसांत तक्रार दाखल
भाजप आमदारावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील ज्वालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश राठोड यांच्यावर पक्षातील एका कार्यकर्तीने बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने पोलिसांत धाव घेत राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वी आमदार सुरेश राठोड यांनी पीडित महिलेच्या पतीच्या विरोधात खंडणी मागून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता. तेव्हा महिलेच्या पतीसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.
Uttarakhand | Under 156(3) section of CrPc on the direction of court, we’ve registered case against BJP’s Jwalapur MLA Suresh Rathore under various sections (376, 504, 506) of IPC: Haridwar SSP Abudai Krishnaraj on rape allegations against the MLA (02.06) pic.twitter.com/YBXC9uquRR
— ANI (@ANI) July 3, 2021
सुरेश राठोड यांनी आपल्यावरी सर्व आरोप फेटाळले आहेत. महिलेने आणि तिच्या पतीने आपल्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागून आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार राठोड यांनी सांगितले. त्याबाबत आपण पोलिसांकडे तक्रारही केली होती, याचा बदला घेण्यासाठी खोटी तक्रार करण्यात आल्याचा दावाही राठोड यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेची तक्रार दाखल केली असून तपास सुरू केला आहे.