Header

नेमबाज साधणार अचूक निशाणा? टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पदकांची आशा

नेमबाज साधणार अचूक निशाणा? टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पदकांची आशा

rahi-tejasvini

हिंदुस्थानसाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा खेळ म्हणून नेमबाजीकडे बघितले जाते. या खेळात हिंदुस्थानला आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य एक कास्य अशी एकूण चार ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने देशाला पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. या वेळी 15 हिंदुस्थानी नेमबाजांनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. त्यामुळे यंदा हिंदुस्थानला नेमबाजीमध्येच सर्वाधिक पदकांची आशा आहे.

 ऑलिम्पिकमधील नेमबाजीचा इतिहास

1896मध्ये झालेल्या पहिल्या समर ऑलिम्पिकमध्ये 9 क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. तेव्हापासून आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण नेमबाजीच्या 59 स्पर्धा झाल्या आहेत. महिला नेमबाजांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यासाठी 1984 साल उजाडावे लागले. नेमबाजीत सध्या रायफल, पिस्तूल व शॉटगन असे तीन प्रकार आहेत. यात 6 पुरुष, 6 महिला व 3 मिश्र प्रकार आहेत. 2016च्या रियो ऑलिम्पिकपर्यंत नेमबाजीमध्ये खेळाडूंना एकूण 322 पदके बहाल करण्यात आलेली आहेत. ऑलिम्पिकमध्ये या खेळात सर्वाधिक पदके अमेरिकेच्या नावावर आहेत. त्यांनी आतापर्यंत 54 सुवर्ण, 29 रौप्य व 27 कास्य अशी एकूण 110 पदकांची लयलूट केलेली आहे. या क्रमवारीत हिंदुस्थान 34व्या स्थानावर आहे.

97 देशांचे 390 नेमबाज सहभागी

1896च्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये 7 देशांतील 31 नेमबाजांनी सहभाग घेतला होता. 1984च्या ऑलिम्पिकमध्ये 68 देशांचे 462 नेमबाज सहभागी झाले होते. 2004च्या ऑलिम्पिकमध्ये 106 देशांच्या 390 नेमबाजांना कोटा मिळाला होता. यात 253 पुरुष, तर 157 महिला नेमबाज होत्या. त्या वेळी ऑलिम्पिकमध्ये 17 नेमबाजी प्रकार खेळले जात होते. 2008मध्ये ही संख्या 15पर्यंत कमी करण्यात आली. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्येही 100 देशांतील 390 नेमबाज रेंजवर उतरले होते. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही 97 देशांतील 390 नेमबाज पदकांसाठी एकमेकांना आव्हान देताना दिसणार आहेत.

चीननंतर हिंदुस्थानलाच सर्वाधिक कोटा

ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 27 वेळा नेमबाजीचा समावेश होता. मात्र गेल्या दोन दशकांपासून हिंदुस्थानने या खेळात प्रगती केली आहे. त्यामुळे 2004, 2008 व 2012 या तीन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी नेमबाजांनी देशाला पदके जिंकून दिली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चीनने नेमबाजीत सर्वाधिक 25 कोटा मिळविला असून हिंदुस्थान सर्वाधिक कोटा मिळविणारा दुसरा देश होय. ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 15 नेमबाज असले तरी पिस्तूल, रायफल व रायफल मिश्र प्रकारात हिंदुस्थानच्या 2-2 संघांना प्रवेश मिळाला आहे. म्हणजेच हिंदुस्थानी नेमबाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये 19 पदकांसाठी कौशल्य पणाला लावणार आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे हिंदुस्थानी नेमबाज

  •  अभिषेक वर्मा
  •  ऐश्वर्य तोमर
  •  अंजुम मौदगील
  •  अपूर्वी चंडेला
  •  दीपक कुमार
  •   दिव्यांश पनवर
  •   इलावेनील वालारिवन
  •   मनू भाकेर
  •  अंगदवीर बाजवा
  •  मायराज खान
  •  राही सरनोबत
  •  संजीव राजपूत
  •  सौरभ चौधरी
  •  तेजस्विनी सावंत
  •   यशस्विनी देसवाल


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article