लसींचा तुटवडा, राज्यांनीच नियोजन करायला हवे, केंद्र सरकारचे हात वर,
देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याबरोबरच राज्यांना लस पुरवठा केला जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने 21 जून रोजी केली. मात्र, देशाच्या अनेक भागात लसींचा तुटवडा निर्माण झाला असताना पेंद्राने हात वर केले आहे. लसींसंदर्भात राज्यांनीच नियोजन करायला हवे असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
उत्पादन होणारी 75 टक्के लसींची खरेदी पेंद्र सरकार करणार आणि राज्यांना मोफत देणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना खरेदी करता येणार आहे. मात्र, एका महिन्याच्या आत हे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. देशाच्या अनेक भागात लस तुटवडय़ामुळे लसीकरण केंद्रे बंद आहेत. यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करीत हात झटकले आणि विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप केला.
डॉ. हर्षवर्धन काय म्हणाले?
n मोफत लस देण्याचे जाहीर केल्यानंतर लसीकरणाने वेग पकडला आणि जुनमध्ये 11.50 कोटी डोस राज्यांना दिले.
n दररोज किती लसींचा पुरवठा केला जाईल याची माहिती पेंद्राकडून राज्यांना 15 दिवस आधी दिली जाते. जुलै महिन्यात 12 कोटी डोस देऊ.
n जर काही समस्या असतील तर त्याचे नियोजन राज्यांनीच करायचे आहे. लसीसंदर्भात आंतरराज्य व्यवस्थापन आणि इतर नियोजनाची जबाबदारी राज्यांची आहे.