Header

लसीकरण कॅम्पची पोलिसांना आगाऊ माहिती देणे सोसायटीला बंधनकारक!

लसीकरण कॅम्पची पोलिसांना आगाऊ माहिती देणे सोसायटीला बंधनकारक!

bmc

कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत घडलेल्या बोगस लसीकरणानंतर मुंबई महापालिकेने नियमावली तयार केली असून त्यातील सूचनांचे पालन करणे लसीकरण कॅम्प घेणाऱया सोसायटी, ऑफिसेसना बंधनकारक आहे. कॅम्पची तीन दिवस आधी पोलिसांना, आरोग्य विभागाला माहिती देणे, अधिकृत खासगी कोविड सेंटरची खातरजमा करणे, असे विविध नियम सोसायटय़ांना पाळावे लागणार असून ही नियमावली पालिकेने आज हायकोर्टात सादर केली.

लसीकरण स्लॉट उपलब्ध होत नसल्याबद्दल सिद्धार्थ चंद्रशेखर यांनी अॅड. अनिता कॅस्टिलिनो यांच्या मार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडल़ी.

नियम काय सांगतात?

  • रजिस्टर खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरद्वारेच लसीकरण मोहीम राबवावी.
  • कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर कोविन पोर्टलवर रजिस्टर आहे की नाही हे पहावे.
  • सोसायटीने सेक्रेटरीची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करावी.
  • लसीची किंमत, तारीख, खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती जाहीर करणे बंधनकारक.
  • आरोग्य अधिकाऱयांनी लसीकरणाच्यावेळी अचानक भेट द्यावी.
  • लसीकरणादरम्यान काही गडबड आढळल्यास आरोग्य अधिकाऱयाने तात्काळ पोलिसांना कळवावे.
  • लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची प्रत्येकाला लिंक उपलब्ध होईल याची नोडल ऑफिसरने खबरदारी घ्यावी.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article