Header

लसीच्या नावाखाली देत होते ग्लुकोजचे पाणी

लसीच्या नावाखाली देत होते ग्लुकोजचे पाणी

img-20210701-wa0154-baramati-1

कांदिवलीतील बोगस लसीकरणप्रकरणी दोन फरार आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. राहुल दुबे आणि राजेश पांडे अशी या दोघांची नावे आहेत. कांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे, तर भोईवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

कांदिवलीतील बेगस लसीकरण प्रकरणात आतापर्यंत दहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीत राजेश पांडे यांचे नाव समोर आले होते, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच राजेश हा बारामती येथे लपला असल्याची कांदिवली पोलिसांना मिळाला. या माहितीनंतर या पथकाने बारामती येथील एका लॉजमध्ये राजेश पांडेला शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले, त्याच्या अटकेनंतर राहुल दुबेला पोलिसांनी अटक केली.

या दोघांनी दहा ठिकाणी लसीकरण कॅम्पचे आयोजन केले होते, राहुल हा शिवम रुग्णालयात, तर राजेश हा अंधेरीतील एका नामांकित रुग्णालयात कामावर होते. शिवम रुग्णालयातील लसीकरण कॅम्पमध्ये आतापर्यंत 17 हजार 100 जणांना लस देण्यात आली होती. या टोळीविरुद्ध आतापर्यंत बोरिवली पोलीस ठाण्यात दोन, कांदिवली, खार, वर्सेवा, बांगूरनगर, भोईवाडा, आंबोली, समतानगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article