Header

सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ची मोठी कारवाई

सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ची मोठी कारवाई

the-enforcement-directorate

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. साताऱयातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्रकुमार घाडगे यांचा असल्याने राजकीय वर्तुळात ‘ईडी’च्या कारवाईबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

साताऱयातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मालकांनी महाराष्ट्र सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवलं. नंतर त्या साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. या कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करून कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article