Header

शिपाई आता निवृत्तीला पीएसआय होणार! प्रस्ताव तयार; लवकरच मंत्रालयात बैठक

शिपाई आता निवृत्तीला पीएसआय होणार! प्रस्ताव तयार; लवकरच मंत्रालयात बैठक

पोलीस दलात भरती झाल्यानंतर वर्षानुवर्षे सेवा करूनही शिपायांना अधिकारीपदापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांना किमान पोलीस उपनिरीक्षकपदापर्यंत पोहोचता यावे, त्यानंतर चार ते पाच वर्षे उपनिरीक्षक म्हणून कामाची संधी मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंप उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

वळसे-पाटील म्हणाले, पोलीस दलात 30 वर्षे सेवा करूनही अनेकांना तीन वेळा पदोन्नती होऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त व्हावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिपाई म्हणून रुजू झालेल्यांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, त्यानंतर त्यांना अधिकारी म्हणून किमान पाच वर्षे काम करण्याची संधी मिळावी या हेतूने गृह विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय लवकर घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक पोलीस शिपायांना अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

राज्यभरातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थ नियोजनात तब्बल 700 कोटींची तरतूद केली आहे. त्यानुसार नवीन घरांसह जुन्या घरांचे नूतनीकरण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

n गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला पवार यांनी होकार दिला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रालयात बैठक घेऊन प्रस्तावावर विचारविनिमय करून निर्णय घेण्याची ग्वाही पवार यांनी दिली आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article