Coronavirus | कोरोना संक्रमित झाल्यानंतर तरूणाला समजले 18 जुन्या आजारांचे रहस्य, लहानपणी केली होती ही चूक

नवी दिल्ली :वृत्त संस्था – Coronavirus | अनेकदा लहानपणी केलेल्या चूका मोठ्या कालावधीपर्यंत नुकसान करतात. अशीच एक घटना 32 वर्षाच्या सूरजच्या बाबतीत घडली आहे. जेव्हा तो 18 वर्षाचा होता तेव्हा त्याने अभ्यास करताना चुकून पेनची निब गिळली होती. जी त्याच्या फुफ्फुसांमध्ये अडकली होती (Coronavirus). जी डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी काढली. निबमुळे तो अनेक वर्ष अस्थमासारख्या आजाराने पीडित होता.
शाळेत झालेल्या चुकीमुळे 18 वर्ष झाला अनेक आजारांचा त्रास
न्यू इंडियन एक्सप्रेसनुसार, ही घटना 2003 ची आहे, जेव्हा अलुवा येथे राहणारा सूरज पेनने शिटी वाजवत असताना निब गिळली होती. त्याच दिवशी त्याला कोच्चीच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि एक्स-रे काढण्यात आला. मात्र, एक्स-रे मध्ये काहीही असामान्य नव्हते. यानंतर घरातील लोकांना वाटले की पेनाची निब पोटातून बाहेर पडली आहे.
कोरोना संक्रमित झाल्यानंतर उघड झाले रहस्य
सूरजला काही काळांपासून फुफ्फुसांच्या संबंधीत आजाराने ग्रासले होते. ज्यामध्ये जुना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. सूरज हा विचार करून विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करत होता की हा त्रास त्याला अस्थमा मुळे होत आहे.
परंतु मागील वषी डिसेंबरमध्ये सूरज कोरोना संक्रमित झाला. त्याची प्रकृती खुप बिघडली. सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला कोच्चीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सीटी स्कॅनमध्ये समजली गडबड
कोरोनाच्या स्थितीचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या छातीचे सीटी स्कॅन केले. सीटी स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या फुफ्फुसाच्या खालील भागात एक लोखंडाची वस्तू दिसली. पुढील उपचारासाठी त्याला अमृता हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.
अमृतामध्ये डॉक्टरांनी सर्जरी न करता पेनची निब काढली. निब उजव्या फुफ्फुसाच्या खालील भाग अडकली होती. निब गुंतगुंतीच्या ब्रोंकोस्कोपिक प्रक्रियेच्या माध्यमातून हटवण्यात आली.
अवघड तंत्रज्ञानाचा वापर करून काढली निब
डॉक्टरांनी सांगितले की, निब मागील 18 वर्षापासून फुफ्फुसात अडकलेली असल्याने तिच्यावर
ऊतींची निर्मिती झाली होती. साठलेल्या ऊती हटवण्याचे पहिले आणि सर्वात अवघड काम होते.
यानंतर कठिण आणि गुंतागुंतीची ब्रोंकोस्कोपी करण्यात आली.
एक दिवस ऑब्झर्वेशनखाली राहिल्यानंतर सूरज गुरुवारी हॉस्पिटलपासून घरी परतला. सूरज आता
जास्त सहजपणे श्वास घेत आहे. सूरजने म्हटले, मी मागील 18 वर्षापासून श्वास आणि खोकल्याच्या
गंभीर त्रासाने पीडित होतो. मला दिलासा मिळाला, अखेर मला आता याच्याशी संबंधीत कोणतीही
दुसरी समस्या सहन करावी लागली नाही.
The post Coronavirus | कोरोना संक्रमित झाल्यानंतर तरूणाला समजले 18 जुन्या आजारांचे रहस्य, लहानपणी केली होती ही चूक appeared first on बहुजननामा.