Header

Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग, व्हायरस पसरण्यापासून रोखणार

Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग, व्हायरस पसरण्यापासून रोखणार

coronavirus corona antimicrobial coating will be done on government buses of maharashtra will prevent the virus from spreading

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना महामारीच्या (Coronavirus) बचावासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्यात जनजीवन रूळावर आणण्यासाठी अनेक उपाय केले जात असताना एमएसआरटीसीने (MSRTC) आपल्या 10,000 बसेसवर अँटी मायक्रोबियल कोटिंग (antimicrobial coating) करण्याचा निर्णय घेतला (Coronavirus) आहे. प्रवासी कोरोनाच्या भितीने सार्वजनिक बसेसचा वापर करणे टाळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कोटिंगचे काम पुढील महिन्यापासून सुरू होईल. कोटिंगचा खर्च प्रति बस 9,500 रुपये येईल. एसटीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली. एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष शेखर छान्ने ( Shekhar Chhanne) यांनी पीटीआयला सांगितले की, कोरोना व्हायरस पसरल्यानंतर लोक सार्वजनिक वाहनांचा वापर टाळत आहेत. अँटी मायक्रोबियल कोटिंगमुळे प्रवाशांच्या मनातील भीती संपुष्टात येईल.

कसे असते हे कोटिंग
अँटी मायक्रोबियल कोटिंग अंतर्गत पृष्ठभागावर केमिकल एजेंट्स लावले जाईल. यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस पसरत नाही. अनेक कार्यालये, एयर लाईन्स इत्यादीत या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, कोटिंगचे टेंडर मेमध्ये काढण्यात आले होते आणि या कामासाठी दोन फर्म निवडण्यात आल्या. फर्मचा दावा आहे की हे कोटिंग दोन ते सहा महिन्यापर्यंत परिणामकारक राहील.

कोरोनापूर्वी 65 लाख प्रवासी
एसटी महामंडळाच्या (ST Corporation) 18 हजार बसेस आहेत. कोरोना महामारीच्या पूर्वी या बसेसने रोज 65 लाख लोक प्रवास करत होते. मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनानंतर बसेसचे संचलन बंद करण्यात आले होते. मर्यादित प्रमाणात बसेस चालवल्या जात होत्या. अनलॉकनंतर पुन्हा संचलन सुरू करण्यात आले. आता एसटी महामंडळाच्या बसेसन केवळ 17 ते 18 लाख लोक रोज प्रवास करत आहेत.

Web Title : coronavirus corona antimicrobial coating will be done on government buses of maharashtra will prevent the virus from spreading

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 6.75 कोटीचं प्रकरण ! मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे यांच्यावर खंडणीचा FIR; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले ‘गहाण’ खत

Tokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी ! थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

The post Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग, व्हायरस पसरण्यापासून रोखणार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article