Header

Pimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण

Pimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण

Pimpri crime two person beat pimpri chinchwad police.

पिंपरी :बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Crime | कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी बाहेर फिरणार्‍यांवर मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणार्‍यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. असे असतानाही अनेक जण विना मास्क फिरत असतात. अशा विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करीत असताना दोघांनी पोलीस कर्मचार्‍यावर लाकडी दांडक्याने डोळ्यावर, कपाळावर मारहाण करुन (Pimpri Crime) जखमी केले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

रामदास सोपान लुकर (Ramdas Sopan Looker) (वय ६५, रा. लुकर चाळ, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) आणि सतीश पवार (Satish Pawar) (वय ४०, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यातील (Pimpri Police) पोलीस शिपायाने फिर्याद दिली आहे. ही घटना मोरवाडी येथील लालटोपीनगर येथे शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजता घडली. फिर्यादी हे विना मास्कची कारवाई करीत असताना आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना शिवीगाळ करुन दंडाच्या पावतीचे पुस्तक हिसकावून घेतले. फिर्यादी यांच्या अंगाशी झटापट करुन त्यांची नोकरी घालविण्याची धमकी दिली. आरोपींना ते पोलीस चौकीत घेऊन जात असताना सतीश पवार हा त्यांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. रामदास लुकर याने तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोळ्यावर, कपाळावर मारुन जखमी करुन सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे (Sub-Inspector of Police Kokate) तपास करीत आहेत.

web title: Pimpri crime two person beat pimpri chinchwad police.

Tokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी ! थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश

AIIMS | कपड्याच्या मास्कने वाढला धोका ! जाणून घ्या AIIMS च्या रिसर्चमध्ये झालेला खुलासा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

Atul Bhatkhalkar | भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला, म्हणाले ‘धरणात…’

The post Pimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article