Header

Pimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत होते तोतया पोलिस, पुढं झालं असं काही…

Pimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत होते तोतया पोलिस, पुढं झालं असं काही…

pimpri crime pimpri police arrest two fake police who collecting money

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Crime | खाकी शर्ट, पँट आणि ब्राऊन बुट घालून रस्त्यावर उभे राहून येणार्‍या जाणार्‍या रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करणार्‍या दोघा तोतया पोलिसांना (Pimpri Crime) पकडले आहे. मच्छिंद्र पांडुरंग ओबांडे (वय ३५, रा. आगरकरवाडी, चाकण) आणि चंद्रकांत वामन कांबळे (वय ३६, रा. एकतानगर, चाकण) अशी त्यांची नावे आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या प्रकरणी चाकण विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस नाईक मच्छिंद्र पोपट भांबरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. आळंदी चाकण रोडवर (Alandi-Chakan Raod) फिर्यादी व त्यांचे सहकारी हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास गेले होते. त्यावेळी चर्‍होली फाटा येथून आळंदी मार्गे चाकणला जात असताना आळंदी चाकण घाटाच्यावर रस्त्याच्या कडेला हे दोघे जण सरकारी गणवेश घालून पोलीस नसताना पोलीस असल्याची बतावणी करुन येणार्‍या जाणार्‍या रिक्षांना थांबवून त्यांची कागदपत्रे तपासणी करुन तुमच्यावर कारवाई करतो असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन पैसे घेत होते.

रिक्षाचालकही त्यांना पोलीस असल्याचे समजून हप्ता देत होते.
कारवाईहून परत येत असलेल्या पोलिसांना यांचा संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर दोघेही तोतया पोलीस असल्याचे आढळून आले.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title : pimpri crime pimpri police arrest two fake police who collecting money

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 6.75 कोटीचं प्रकरण ! मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे यांच्यावर खंडणीचा FIR; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले ‘गहाण’ खत

Rajsthan | भाजपा नेत्यावर हल्ला, शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली मारहाण, कपडे फाडले

Atul Bhatkhalkar | भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला, म्हणाले ‘धरणात…’

The post Pimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत होते तोतया पोलिस, पुढं झालं असं काही… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article