Header

Pune Police | पुणे पोलीस दलात ‘कोल्ड वॉर?, महिला IPS अधिकाऱ्यानेच केला ‘वसुली’चा आरोप

Pune Police | पुणे पोलीस दलात ‘कोल्ड वॉर?, महिला IPS अधिकाऱ्यानेच केला ‘वसुली’चा आरोप

pune police cold war in senior police officers in pune police

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे पोलीस (Pune Police) दलात कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप (Audio clip) प्रचंड व्हायरल झाली. यानंतर आयपीएस (IPS) महिला अधिकारी पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (Deputy Commissioner of Police Priyanka Naranware) यांनी ही ऑडिओ क्लिफ मार्फ असल्याचे सांगत पुणे पोलीस (Pune Police) दलातील अधिकारी-कर्मचारी हप्ते घेत असल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून यावरून आता कोल्ड वॉर (Cold War) सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियंका नारनवरे (deputy commissioner of police priyanka naranavre) यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा माध्यमांकडे करताना गौप्यस्फोट केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

काही कर्मचारी 10-10 वर्षे झाले ते हप्ता वसुली करायचे. त्यांची बदली (Transfer) करण्यात आली. तरी देखील ते तेथून हप्ता वसूल करीत होते. मी आल्यापासून येथील कर्मचाऱ्यांचे हितसंबंध दुखावले आहेत. पूर्वी असलेल्या डीसीपी (DCP) यांचे हितसंबंध असल्यानेच हा प्रकार घडविण्यात आल्याचा आरोप पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी केला. नारनवरे यांच्या खुलाशानंतर पुणे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सध्या पुणे पोलिस दलात उच्च पदस्थ अधिकार्‍यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासुन पोलिस दलात सुरू आहे. मात्र ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तसेच त्याबाबतच्या खुलाशानंतर कोल्ड वॉर सुरू असल्याचं अगदी स्पष्ट झालं आहे.

Web Title : pune police cold war in senior police officers in pune police

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 6.75 कोटीचं प्रकरण ! मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे यांच्यावर खंडणीचा FIR; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले ‘गहाण’ खत

Tokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी ! थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

The post Pune Police | पुणे पोलीस दलात ‘कोल्ड वॉर?, महिला IPS अधिकाऱ्यानेच केला ‘वसुली’चा आरोप appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article