Gold Price Today | ‘या’ आठवड्यात सुद्धा स्वस्त झाले सोने, आता 9051 रुपये कमी दरात खरेदी करा 10 ग्रॅम; जाणून घ्या भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा दागिने बनवायचे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या किमतीत या व्यवहाराच्या आठवड्यात सुद्धा हालचाल जारी राहिली. या आठवड्यात सोन्यासह चांदी सुद्धा स्वस्त झाली. 23 ऑगस्ट 2021 पासून 27 अगस्त 2021 च्या दरम्यान पाच व्यवहारांच्या सत्रात सोने एकुण 262 रुपये प्रति 10 ग्राम स्वस्त झाले आहे. या दरम्यान चांदी 870 रुपये प्रति किलोग्रॅमने (Gold Price Today) स्वस्त झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या व्यवहाराच्या आठवड्यात सोने-चांदीची वाटचाल
सोन्याची आठवड्यातील वाटचाल (प्रति 10 ग्रॅम)
– सोमवारी सोने 47411 रुपये
– मंगळवारी 47710 रुपये
– बुधवारी 47340 रुपये
– गुरुवारी 47350 रुपये
– शुक्रवारी 47149 प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाली.
चांदीची आठवड्यातील वाटचाल (प्रति किलोग्रॅम)
– सोमवारी 63608 रुपये
– मंगळवारी 63450 रुपये
– बुधवारी 63073
– गुरुवारी 63230 रुपये
– शुक्रवारी 62938 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.
14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर
अशाप्रकारे शुक्रवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47149 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46960 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43188 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35362 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27585 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.
ऑलटाइम ‘उच्चांकी’पासून सोने 9000 आणि चांदी 17000 रुपये स्वस्त
सोने सध्या आपल्या सर्वकालीन उच्च स्तरापासून सुमारे 9051 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोने आपल्या सर्वकालीन उच्च स्तरावर ऑगस्ट 2020मध्ये होते.
त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रती 10 ग्रामच्या स्तरावर होते. तर चांदीचा सर्वकालीन उच्चस्तर 79980 रुपये प्रति किलो आहे. या हिशेबाने चांदी सुद्धा आपल्या उच्चतम स्तरापासून सुमारे 17042 रुपये स्वस्त विकली जात आहे.
गुंतवणुकीसाठी करा थोडी प्रतिक्षा !
सराफा बाजारातील जानकारांनुसार, सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी घसरण येईल. सोने पुन्हा एकदा 45,000 हजार प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68000 प्रति किलोच्या जवळपास येऊ शकते. अशावेळी ज्या लोकांना सोने-चांदीत गुंतवणुक करायची आहे त्यांनी थोडी प्रतिक्षा करणे चांगले ठरू शकते.
Web Title : Gold Price Today | gold silver jewelry price rate update 29th august know latest rate indian sarafa market
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
The post Gold Price Today | ‘या’ आठवड्यात सुद्धा स्वस्त झाले सोने, आता 9051 रुपये कमी दरात खरेदी करा 10 ग्रॅम; जाणून घ्या भाव appeared first on बहुजननामा.