Header

Modi Government | जर घरबसल्या दरमहिना पाहिजेत 5000 रुपये, तर ‘इथं’ करा गुंतवणूक; जाणून घ्या मोदी सरकारची योजना

Modi Government | जर घरबसल्या दरमहिना पाहिजेत 5000 रुपये, तर ‘इथं’ करा गुंतवणूक; जाणून घ्या मोदी सरकारची योजना

Modi Government earn money with atal pension yojana get 5000 rupees per month check how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | जर तुम्ही सुद्धा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana- APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये पहिल्यांदा असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी सुरू केली होती, परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षाचा कुणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करून पेन्शनचा लाभ मिळवू शकतो, ज्यांच्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट आहे. या योजनेत 60 वर्षानंतर जमाकर्त्यांना पेन्शन मिळण्यास (Modi Government) सुरुवात होते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

1 काय आहे अटल पेन्शन योजना?
अटल पेंशन स्कीममध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते.
या योजनेंतर्गत किमान 1,000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते.
या पेन्शनसाठी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाऊंट, आधार नंबर आणि एक मोबाइल नंबर असावा.

2 मिळतात हे बेनिफिट
18 वर्षाच्या वयात योजनेतून कमाल 5 हजार रुपये मासिक पेन्शनसाठी सहभागी झालात तर दर महिना 210 रुपये द्यावे लागतील.

3 अशाप्रकारे दरमहिना मिळेल 5000 रु पेन्शन
जर एखादी व्यक्ती 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी होत असेल आणि वयाच्या 60 व्या वर्षानंतर
1,000 रुपये मासिक पेन्शन पाहिजे असेत तर त्यास 60 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 42 रुपये खर्च करावे लागतील.
जर, या व्यक्तीला 5,000 रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर त्यास 60 वर्षांचा होईपर्यंत प्रति महिना 210 रुपये जमा करावे लागतील.
या स्कीम अंतर्गत 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये आणि 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.

4 टॅक्स बेनिफिट
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एनपीएसप्रमाणे समान कर सवलत मिळते.
आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.

5 APY चे डेथ बेनिफिट्स
अटल योजनेच्या पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यानंतर रक्कम काढण्यासाठी किंवा पेन्शन योजना सुरू ठेवण्यासाठी जी बँक किंवा टपाल कार्यालयात खाते आहे तिथे संपर्क साधा.
सोबतच पॉलिसी धारकाचे मुळ मृत्यू प्रमाणपत्र, नॉमिनीचे केवायसी, नॉमिनीच्या बँक खात्याची माहिती, नॉमिनीचे खातेधारकाशी असलेल्या संबंधाचा पुरावा घेऊन जा.
येथे बँक शाखा तुमच्याकडून आवश्य माहिती मागेल आणि व्हेरिफेकेशननंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Web Title : Modi Government | earn money with atal pension yojana get 5000 rupees per month check how

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

The post Modi Government | जर घरबसल्या दरमहिना पाहिजेत 5000 रुपये, तर ‘इथं’ करा गुंतवणूक; जाणून घ्या मोदी सरकारची योजना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article