Header

Pune Crime | दुर्दैवी ! पुण्यात बुरख्याचा झोपाळा बनवून खेळताना 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Pune Crime | दुर्दैवी ! पुण्यात बुरख्याचा झोपाळा बनवून खेळताना 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

pune crime pimpri 8 year old girl died while playing

पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – बुरख्याचा झोपाळा बनवून खेळत असताना फास बसून एका आठ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Crime) घडली आहे. सुमैय्या शेख (Sumaiya Sheikh) असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ही घटना ज्यावेळी घडली (Pimpri Crime) त्यावेळी घरात तिचे पालक नव्हते. तसेच इतर तीन बहिणी आपापल्या कामात व्यस्त होत्या. हा प्रकार चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीत घडला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात शेख कुटुंब राहते. त्यांना चार मुली असून मयत सुमैय्या ही सर्वात लहान होती. रविवारी (दि.29) दुपारी अडीचच्या सुमारास समैय्या दरवाजाच्या हँगरला बुरख्याचा झोपाळा करुन झोका खेळत होती. तेव्हा एक बहीण बेडरुममध्ये, दोन बहिणी हॉलमध्ये त्यांच्या कामात व्यस्त होत्या.

तर सुमैय्याचे आई-वडिल हे घराबाहेर गेले होते. त्याचवेळी सुमैय्याचा बुरख्याच्या झोपळ्यावरुन पाय
निसटला आणि तिला गळफास बसला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. काही वेळाने घरातील लोक आले
असता त्यांना मुलगी लटकल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Web Title : pune crime pimpri 8 year old girl died while playing

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

The post Pune Crime | दुर्दैवी ! पुण्यात बुरख्याचा झोपाळा बनवून खेळताना 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article