Header

Nagpur Crime | 12 वर्षे लहान विद्यार्थ्यांशी विवाह करणार्‍या वकिल महिलेची सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार; सासु-सासर्‍यांसह चार जणांना अटक

Nagpur Crime | 12 वर्षे लहान विद्यार्थ्यांशी विवाह करणार्‍या वकिल महिलेची सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार; सासु-सासर्‍यांसह चार जणांना अटक

nagpur crime complaint of harassment against father in law of a woman lawyer who is married to a student four arrested including in laws

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime | आपल्यापेक्षा वयाने तब्बल 12 वर्षे लहान असलेल्या आपल्याच विद्यार्थ्याशी वकिल महिला प्राध्यापिकेने केलेला प्रेमविवाह संपूर्ण नागपूरात (Nagpur Crime) चर्चेचा विषय झाला होता. आता या प्राध्यापक महिलेने आपल्या सासरच्या मंडळींविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार छळाची फिर्याद दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी (Sitabardi police) या वकिल महिलेच्या सासुसासर्‍यांसह दोन नातेवाईकांना अटक केली आहे. तिचा पती मात्र फरार झाला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या प्रकरणातील फिर्यादी (वय 34) या एका विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचे त्याच विधी शाखेत शिकत असलेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रेम संबंध जुळले. मुलाचे कुटुंबिय हे हायप्रोफाईल असल्याने याची चर्चा संपूर्ण नागपूरातील सामाजिक क्षेत्रात होऊ लागली होती. प्रेमसंबंधानंतर त्यांनी गेल्या वर्षी प्रेमविवाह केला. विवाहानंतर ही प्राध्यापक महिला पतीच्या घरी रहायला आली. हा आंतरजातीय विवाह असल्याने त्याला मुलाच्या घरातून विरोध होता. त्यातूनच सासरी आपल्या शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन सासु सासरे व पतीचे दोन मामा छळ करु लागले. हा छळ असाह्य झाल्याने शेवटी या महिला वकिलाने सीताबर्डी पोलिसांकडे (Sitabardi police) फिर्याद दिली. आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचे त्यात नमुद करण्यात आले. तिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा (atrocity act) दाखल केला आहे.

दरम्यान, या महिलेचा पती फरार झाला आहे. त्याने अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्याची सोमवारी सुनावणी होणार आहे. सहायक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव (assistant commissioner of police trupti jadhav) तपास करीत आहेत.

Web Title : nagpur crime complaint of harassment against father in law of a woman lawyer who is married to a student four arrested including in laws

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

Weight Loss | कॅलरी इनटेक कमी करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, कमी होईल लठ्ठपणा

The post Nagpur Crime | 12 वर्षे लहान विद्यार्थ्यांशी विवाह करणार्‍या वकिल महिलेची सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार; सासु-सासर्‍यांसह चार जणांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article