Header

NIA कडून काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे, एका दहशतवाद्याला अटक

NIA कडून काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे, एका दहशतवाद्याला अटक

nia raids 15 places in j k arrests a terrorist

श्रीनगर : वृत्तसंस्था – राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)ने जम्मू काश्मीरमध्ये १५ ठिकाणी छापे घालून एका दहशतवाद्याला अटक केली. अनंतरनागमधील बटींगूचा रहिवासी इरफान अहमद दार याला अटक करण्यात आली आहे. दहशतवादी संघटना जैश ए महम्मदच्या प्रमुखाच्या अटकेनंतर सुमारे एक महिन्यांनंतर त्याने एक सनसनाटी खुलासा केला होता. त्यात या प्रमुखाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (national security advisor ajit doval) यांच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कार्यालयाचे चित्रिकरण करण्यात आले होते असे सांगितले आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील १५ ठिकाणी हे छापे (NIA) घालण्यात आले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

NSA अजित डोवाल यांच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा कट
जम्मू – काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यासह एनआयएच्या अनेक पथकांनी पुलवामा, शोपियान, श्रीनगर, अनंतनाग, जम्मू आणि बनिहाल या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. त्यात इरफान दार याला अटक केली आहे. अटक केलेल्या इतर आरोपींच्या संगनमताने तो दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी जम्मू जिल्ह्यातील गंग्याल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपास मोहीमेत मोबाईल फोन, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप आणि दहशतवाद पसविण्यासाठीचे जिहादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. लेम प्रमुख हिदायत उल्लाह मलिकला अनंतनाग पोलिसांनी जम्मूच्या कुंजवानी भागातून या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तो हिवाळी राजधानी जम्मूत तळ उभारण्याची आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता. मलिक भूतकाळात इतर दहशतवादी गटांशी संबंधित आहे. त्याच्या गटाचा बँक रॉबरीपासून अनेक दहशतवादी कृत्यात सहभाग स्पष्ट झाला आहे.

Web Title : nia raids 15 places in j k arrests a terrorist

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

Weight Loss | कॅलरी इनटेक कमी करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, कमी होईल लठ्ठपणा

The post NIA कडून काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे, एका दहशतवाद्याला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article