Header

Nagpur Crime | दोस्त दोस्त ना रहा ! रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा

Nagpur Crime | दोस्त दोस्त ना रहा ! रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा

Nagpur Crime nagpur murder news

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर (Nagpur Crime) जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. व्यसनाधीन मित्र दारू पाजण्यासाठी त्रास देत असल्याकारणाने तिघांनी मिळून त्या व्यसनाधीन मित्राची हत्या (Murder) केली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे. शुभम आनंद तिलघरे (वय, ३०, रा. वाघधरा) असं मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेचा प्रकार (Nagpur Crime) काल (गुरुवारी) उघडकीस आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत अधिक माहिती अशी, मृत शुभम तिलघरे (Shubham Tilghare) याला दारू आणि गांजाचे अधिक व्यसन होते. तो त्याच्या मित्रांना सतत दारू पाजण्यासाठी त्रास देत होता.
कधीकधी हिंसक होऊन मारहाण करत धमकी देखील देत होता.
अशा प्रकारच्या त्रासाला त्याचे सर्वच मित्र वैतागले होते.
दिवसभर मेहनत करून पैका मिळवायचा आणि शुभवर का खर्च करायचा? असं त्या मित्रांना वाटत होतं. त्याचा एकदाच छडा लावायला हवा.
असं वाटायचं. मात्र त्या सर्व मित्रांपैकी आरोपी नीलेश उर्फ गजनी शहा (Nilesh/Gajani Shah),
अरून जसवंत सिंग (Arun Jaswant Singh) आणि बबलू रामाधर सलोडिया (Bablu Ramadhar Salodia) या तिघांनी शुभम तिलघरेला संपवण्याचा कट रचला.

दरम्यान, नेहमीप्रमाणे शूभम बुधवारी रात्रीच्या दरम्यान आरोपींच्या मागे दारूसाठी तगादा लावला.
आरोपींनी त्याला राजीवनगरमधील दारूच्या भट्टीत दारू पाजली.
नंतर शूभमला एका पडक्या शाळेच्या ओसाड परिसरात नेले.
आणि आरोपींनी शूभमवर चाकूचे वार केले. त्याच्यावर वार करून ठार मारले.
गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला.

दरम्यान, याबाबत माहिती समजताच एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर (Thanedar Umesh Besarkar) यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस उपायुक्त सारंग आवाड (DCP Sarang Awad) यांनीही भेट देऊन माहिती जाणून घेतली.
शूभमला रात्री आरोपी नीलेश, अरूण आणि बबलू या तिघांनी सोबत नेले होते, ही माहिती कळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन गुरुवारी सायंकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, त्याला धाक दाखवून त्याचा नेहमीचा त्रास संपवण्याचा आरोपींचा उद्देश होता.
नंतर मात्र त्याला जिवंत सोडले तर तो नशेसाठी आपलाच कुणाचा जीव घेईल, असं आरोपींना वाटले.
म्हणून त्यांनी त्याचा खून (Murder) केला.

Web Title : Nagpur Crime | nagpur murder news

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्‍यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम

Mobile SIM | तुमच्या Aadhar card वरून किती मोबाइल SIM Card आहेत सुरू? ‘टॅफकॉप’द्वारे एका क्लिकवर मिळवू शकता माहिती; जाणून घ्या

The post Nagpur Crime | दोस्त दोस्त ना रहा ! रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article