Header

Pune Crime | तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्ट्रेशन करुन केली व्यावसायिकाची 13 लाखांची फसवणूक

Pune Crime | तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्ट्रेशन करुन केली व्यावसायिकाची 13 लाखांची फसवणूक

pune crime prasanna shirudkar and sherwari prasanna shirudkar cheated the businessman of rs 13 lakh by making fake registration

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | वकील असल्याची बतावणी करून १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन देतो असे सांगून बनावट कागदपत्रे बनवून एका बांधकाम व्यावसायिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अमित दत्तात्रय घुले Amit Dattatraya Ghule (वय ४२, रा. मांजरी बु़ ता. हवेली) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रसन्न शिरुडकर Prasanna Shirudkar (वय ४१) आणि शर्वरी प्रसन्न शिरुडकर Sherwari Prasanna Shirudkar (वय ४०, दोघे रा. अ‍ॅड्रसेस सोसायटी, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित घुले हे त्यांच्या ओळखीच्या अ‍ॅड. पठाण यांच्याकडे गेले असताना तेथे शर्वरी शिरुडकर व प्रसन्न शिरुडकर यांची फिर्यादीशी ओळख झाली. त्यांनी आम्ही वकील असल्याचे सांगून त्यांच्याशी ओळख वाढविली.

तुमचे दस्त रजिस्ट्रेशन करुन देतो, असे सांगितले. ते वकील नसताना फिर्यादी यांच्या मांजरी बु़ येथील शारदा कॉम्प्लेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डिंगमधील १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून सात बारा उतारा, ८ अ उतारा अशी कागदपत्रे तसेच फ्लॅट विक्रीचे मुळ दस्त
घेऊन ७ फ्लॅटचे १८ मे व १९ मे २०२१ या दोन दिवसात दापोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालय,
हवेली क्रमांक २५ येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्रे बनवून त्यांचा वापर करुन
रजिस्ट्रेशन करुन फिर्यादी यांची १३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पोलीस निरीक्षक
जितेंद्र कदम (Police Inspector Jitendra Kadam) तपास करीत आहेत.

Web Title : pune crime prasanna shirudkar and sherwari prasanna shirudkar cheated the businessman of rs 13 lakh by making fake registration

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्‍यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम

Mobile SIM | तुमच्या Aadhar card वरून किती मोबाइल SIM Card आहेत सुरू? ‘टॅफकॉप’द्वारे एका क्लिकवर मिळवू शकता माहिती; जाणून घ्या

The post Pune Crime | तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्ट्रेशन करुन केली व्यावसायिकाची 13 लाखांची फसवणूक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article