Header

Neelam Rane | नारायण राणेंच्या अटकेच्या कारवाईवर पत्नी नीलम राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Neelam Rane | नारायण राणेंच्या अटकेच्या कारवाईवर पत्नी नीलम राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

neelam rane neelam rane first reaction to her husband narayan rane arrest

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Neelam Rane | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Union Minister Narayan Rane) अटक करण्यात आली. त्यादरम्यान राज्यात राजकारण चांगलंच तप्त झालेलं पाहायला मिळालं. यांनतर राणेंना अटक, त्यांनतर त्यांना झालेली सुटका यानंतरही शिवसेना आणि भाजप आक्रमक होताना दिसले. अनेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियेनंतर नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणेंनी (Neelam Rane) देखील पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘शिवसेनेकडून असं कधी केलं जाईलं कधीच वाटलं नव्हतं, असं नीलम राणेंनी (Neelam Rane) म्हटलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Union Minister Narayan Rane) अटकेच्या कारवाईवरही नीलम राणेंनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रतिक्रिया देताना नीलम राणे (Neelam Rane) म्हणाल्या की, ‘आयुष्यातील 40 वर्षे माझे पती नारायण राणे यांनी शिवसेना पक्षासाठी दिली. जो याआधी पक्षाचा नेता होता. त्याच्यासोबत शिवसेना पक्ष असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेना आज जे काही करत आहे त्यावर नेमकं काय बोलावं हे देखील समजत नसल्याचं त्या म्हणाल्या.
पुढं बोलताना नीलम राणे (Neelam Rane) म्हणाल्या, ‘मुंबईतल्या आमच्या जुहू येथील घरावर
हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही घरात नव्हतो पण माझी नातवंडं, सुना घरात
असताना हा प्रकार झाला. त्याचं मला खूप वाईट वाटलं, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावेळी तुम्ही दोन्ही मुलांना काय सल्ला देतात? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ‘शांतपणे आपलं काम केलं पाहिजे. असं मी नेहमी दोघांना सांगत असते. भाजप आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे पुन्हा असं काही होईल असं वाटत नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. तसेच, ज्यावेळी घरावर चाल करुन माणसं येतात. तेव्हा त्यांना बेस उरलेला नाही असं वाटतं. असं राजकारण याआधीही कधी झालं नाही. या थराला कुणी गेलं नाही, अशी देखील खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title : neelam rane neelam rane first reaction to her husband narayan rane arrest

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Bhavana Gavali | ईडीचा दणका ! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ED चा छापा

Satara Crime | लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं शोले स्टाईलनं आंदोलन करत केला आत्महत्येचा प्रयत्न

Jayant Patil | ‘वाझे प्रकरणात ‘1 नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्तच

The post Neelam Rane | नारायण राणेंच्या अटकेच्या कारवाईवर पत्नी नीलम राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article