Header

Pune News | दुर्दैवी ! भरधाव PMPML बसच्या धडकेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune News | दुर्दैवी ! भरधाव PMPML बसच्या धडकेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

pune news unfortunate 16 year old girl killed in bhardhav pmpml bus collision

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पीएमपीएमएल बसच्या (PMPML Bus) धडकेत सायकलवरून (Bicycle) जात असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. चंदा परमार (वय,16, रा. थोरवे चौक, दीप बंगला चौकाजवळ, मॉडेल कॉलनी) असं त्या मृत अल्पवयीन मुलीचं नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास मॉडेल कॉलनीतील दीप बंगला चौकानजदीक (शिवाजीनगर-Shivajinagar, Pune) येथे घडली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत अधिक माहिती अशी, चंदा परमार (Chanda Parmar) हि तिच्या सायकलवरून शनिवारी दुपारी 1 वाजता दीप बंगला चौकाजवळच्या थोरवे चौकातुन डिएसके शो रूमसमोरील रस्त्याने जात होती. त्यावेळी गोखले नगर-पुणे स्टेशन या मार्गावरील ‘पीएमपीएमएल’ बस (MH. 12.FZ, 8320) हि शिवाजीनगरकडे जात होती. त्यावेळी चंदाला बसच्यामधील भागाचा धक्का बसल्याने ती दुभाजकावर (Divider) आदळली.

त्यावेळी तिच्या कमरेला जबर मार लागल्याने. गंभीर दुखापत झाली.अशाच अवस्थेतच चंदाला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. ससून रुग्णालयात उपचाराअंती सायंकाळी तिचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पीआय अनिता मोरे (Senior PI Anita More) यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.

Web Title : pune news unfortunate 16 year old girl killed in bhardhav pmpml bus collision

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Bhavana Gavali | ईडीचा दणका ! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ED चा छापा

Satara Crime | लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं शोले स्टाईलनं आंदोलन करत केला आत्महत्येचा प्रयत्न

Jayant Patil | ‘वाझे प्रकरणात ‘1 नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्तच

The post Pune News | दुर्दैवी ! भरधाव PMPML बसच्या धडकेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article