Header

Pune Anti Corruption | 5000 रुपयाची लाच घेताना शिरूर येथील भूकरमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Anti Corruption | 5000 रुपयाची लाच घेताना शिरूर येथील भूकरमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Anti Corruption While taking bribe of Rs five thousand prashant mohan kamble arrested by acb pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जमीनीच्या मोजणीसाठी पाच हजार रुपयाची लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला (Surveyor) अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा (Pune Anti Corruption) रचून अटक केली आहे. पुणे अ‍ॅन्टी करप्शन पथकाने (Pune Anti Corruption) ही कारवाई सोमवारी (दि.30) करण्यात आली. प्रशांत मोहन कांबळे (Prashant Mohan Kamble) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या भूकरमापकाचे नाव आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी 53 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या जमिनीच्या मोजणीकरीता (Land survey) अर्ज केला होता. जमीनीची मोजणी करण्यासाठी भूकरमापक प्रशांत कांबळे याने पाच हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन पथकाकडे तक्रार दिली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली.
सोमवारी सापळा रचून प्रशांत कांबळे याला तक्रारदार यांच्याकडून 5000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले.
प्रशांत कांबळे याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur police station) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Web Title : Pune Anti Corruption | While taking bribe of Rs five thousand prashant mohan kamble arrested by acb pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

The post Pune Anti Corruption | 5000 रुपयाची लाच घेताना शिरूर येथील भूकरमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article