Header

Parambir Singh | परमबीर सिंह यांनी भरला 50 हजाराचा दंड, जाणून घ्या प्रकरण

Parambir Singh | परमबीर सिंह यांनी भरला 50 हजाराचा दंड, जाणून घ्या प्रकरण

param bir singh puts rs 50000 in cms fund

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या खंडणीचे आरोप करणारे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) प्रतिज्ञापत्रं सादर न केल्याने त्यांना 50 हजाराचा दंड ठोठावण्यात आला होता. यावरुन अखेर त्यांना सुनावण्यात आलेल्या पन्नास हजाराचा दंड भरला आहे. हा निधी त्यांना मुख्यमंत्री कोव्हिड निधीत (CM Covid Nidhi) जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावरुन हा निधी सिंह यांनी जमा केलाय.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) 3 वेळा दंड ठोठावला होता. यापुर्वी परमबीर सिंह यांना 5000 रुपये. नंतर 25 हजार रुपये आणि नंतर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानुसार परमबीर सिंग यांनी अखेर ही रक्कम जमा केली आहे. या दरम्यान, परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्या. चांदिवाल आयोगाची स्थापना केली गेली. आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. याबाबत सचिन वाझेचा (Sachin Vaze) जबाब नोंदवला आहे. आयोगाने समन्स बजावून सचिन वाझेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्या. चांदीवाल यांनी स्वतः सचिन वाझेचा जबाब नोंदवला. परंतु, परमबीर सिंह यांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं नव्हतं. यावरुन सिंह यांना दंड ठोठावला होता.

दरम्यान, चांदिवाल समितीस चौकशी आयोग अधिनियम 1952 मधील कलम 4,5 अ, 8,9 नुसार दिवाणी आणि अनुषंगिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास ही समिती याप्रकरणाचा तपास आणि अन्य संस्थांकडे सोपवण्याची शिफारस करु शकते. या समितीला अलीकडेच कार्यालयासाठी जागा देण्यात आली. 6 महिन्यात चांदिवाल समितीकडून चौकशीला अहवाल (Report) सादर केला जाईल.

Web Title : param bir singh puts rs 50000 in cms fund

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

The post Parambir Singh | परमबीर सिंह यांनी भरला 50 हजाराचा दंड, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article