Header

Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती

Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती

supreme court plea in sc seeking exemption for lawyers from wearing black coats gowns during summer

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court | सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एक याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील उच्च न्यायालयांत उन्हाळ्याच्या हंगामात वकिलांना काळा कोट आणि काळ्या गाऊनमधून सूट देण्याची विनंती केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याचिकेत विनंती केली आहे की, स्टेट बार कौन्सिलला निर्देश द्यावेत की, त्यांनी आपल्या नियमात दुरूस्ती करून संबंधित राज्यांत उन्हाळ्याच्या दिवसात वकिलांना काळा कोट आणि गाऊन घालण्यापासून सूट द्यावी. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, उन्हाळ्यात वकिलांना काळा कोट घालून एका कोर्टातून दुसर्‍या कोर्टात
जाण्यात खुप त्रास होतो. वकिलांचा ड्रेस कोडचा नियम अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट 1961 च्या अंतर्गत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमातून संचालित होतो.

यामध्ये वकीलांसाठी कोर्टात सादर होताना काळा कोट, सफेद शर्ट आणि गळ्यात सफेद फित लावणे अनिवार्य आहे. नियमानुसार वकिलांसाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात सादर होतानाच गाऊन घालणे अनिवार्य आहे.

Web Title : supreme court plea in sc seeking exemption for lawyers from wearing black coats gowns during summer

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम होत आहे लागू, बँक अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर करून घ्या अपडेट; जाणून घ्या ADPS बाबत

Free Wi-Fi | खुशखबर ! राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत ‘वाय-फाय’ कनेक्शन, विद्यार्थ्यांना मिळेल सुविधा

Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण

The post Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article