Header

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

aadhaar card uidai major changes in aadhaar card related rules know the advantages and disadvantages

नवी दिल्ली: वृत्तसंस्था –  Aadhaar Card | प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड (Aadhaar Card) असणे सरकारने बंधनकारक केले आहे. भारतीय युनिक आयडेंटिफिकेश ऑथोरिटी (UIDAI) या आधारकार्ड (Aadhaar Card) जारी करणाऱ्या संस्थेकडून प्रत्येकाला आधार कार्ड दिले जाते. यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, जन्मतारीख यासह बायोमेट्रिक माहिती (Biometric Information) घेऊन आधार कार्ड तयार करण्यात येते. तसेच प्रत्येक व्यक्तीला एक आधार क्रमांक दिला जातो. प्रत्येक सरकारी कामासाठी (government work), आर्थिक व्यवहारासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. प्रत्येकाने आधार कार्ड बनवून घ्यावे म्हणून यासाठी लागणारे पडताळणी शुल्क (Authentication Charges) कमी करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

UIDAI ने ग्राहकांच्या आधार पडताळणीसाठी लागणारी 20 रुपयांची रक्कम आता कमी केली आहे. आता ग्राहकांना पडताळणीसाठी केवळ तीन रुपये द्यावे लागणार आहेत.  NPCI-IAMAI द्वारे आयोजित जागतिक फिनटेक फेस्टमध्ये (Fintech Fest) UIDAI चे सीईऔ सौरभ गर्ग (CEO Saurabh Garg) यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेऊन शकतील असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला आहे. आधार कार्ड बनवताना प्रत्येक व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती म्हणजे डोळ्याचे स्कॅन आणि बोटांचे ठसे घेतले जातात. ही माहिती अत्यंत सुरक्षित ठेवली जाते, असेही त्यांनी सांगितले.आधार प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांची ओळख पडताळणी केली जाते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

आजपर्यंत 99 कोटी ई-केवायसीसाठी (E Kyc) आधार प्रणालीचा वापर करण्यात आल्याची माहिती गर्ग यांनी दिली. आर्थिक क्षेत्रात आधारला मोठी संधी आहे. याशिवाय ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीनं ही प्रक्रिया आणखी सोपी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सौरभ गर्ग (uidai ceo saurabh garg) यांनी सांगितले.

घरबसल्या बनवा आधार कार्ड

आधार कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता येते. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. यासाठी तुम्हाला UIDAI च्या https://uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ‘My Aadhaar’  टॅबवर क्लिक करा. त्यानंत अपॉइंटमेंट  बुक करण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला शहराचा पर्याय निवडावा लागेल. ते निवडल्यानंतर प्रोसेस टू बुक ऑन अपॉइंटमेंट वर क्लिक करा. आता नवीन पेज ओपन होईल. त्यावर न्यू आधार, आधार अपडेट आणि मॅनेज अपॉइंटमेंट असे तीन पर्याय असतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकता. योग्य पर्याय निवडल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. तुम्हाला भेटीसाठी उपलब्ध वेळेचा स्लॉट निवडावा लागेल. हे सर्व झाल्यानंतर सबमिट वर क्लिक करा. तुमची अपॉइंटमेट बुक होईल. (Aadhaar Card).

 

 

web title: Aadhaar card uidai major changes in aadhaar card related rules know the advantages and disadvantages.

 

Virginity | ‘व्हर्जिनिटी’ (कौमार्य) गमावण्याला दिले गेले नवीन नाव, जगात सुरू झाली ‘चर्चा’ !

Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्‍या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई

Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

Parenting | चुकूनही मुलांना बोलू नका ‘या’ 5 गोष्टी, भारतीय पालक करतात ‘या’ चूका ज्या पडतात महागात; जाणून घ्या

The post Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article